‘होईन सावली उन्हात घर जरी…’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे शीर्षकगीत व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक संपले म्हणून त्या मालिका ऑफ एअर गेल्या. तर काही मालिकांचा टीआरपी खाली घसरल्याने त्या मालिका बंद करण्यात आल्या. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होताना दिसत आहेत. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका सुरु झाली असून तिला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. यानंतर लवकरच सुरु होणारी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आता चर्चेत आहे. अलीकडेच या मालिकेचे शीर्षक गीत प्रदर्शित झाले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या २० नोव्हेंबर २०२३ पासून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ हि मालिका सुरु होते आहे. या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर किशोरी अंबिये, दीपाली पानसरे या अभिनेत्री देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत अलीकडेच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या शीर्षकगीताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या शीर्षकगीताचे बोल पुढीलप्रमाणे आहेत,
धरूनिया तुझा हात हाती.. चालेन सख्या जन्मसाती..
सहवासात हा सुगंध भरला तुझा, बहरून येईल तू हसता जरा..
होईन सावली उन्हात घर जरी.. उधळण चांदणे मी तुझियावरी..
घेऊन शुभशकुन आले.. लक्ष्मीच्या पाऊलांनी… !!’
दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका ‘स्टार जलशा’वरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गातचोरा’ आणि ‘स्टार प्लस’वरील ‘तेरी मेरी डोरियाँ’चा मराठी रिमेक असल्याचे बोलले जात आहे.