हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शनिवारी घराघरातील पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळींच्याही घरातील बाप्पाने काल निरोप घेतला. मराठी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून प्रकाशझोतात आलेली बालकलाकार मायरा वैकुळच्याही घरी सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाला होता. पाच दिवसानंतर त्याने वैकुंठ कुटुंबाचा निरोप घेतला. पण बाप्पाच्या विसर्जनादरम्यान मायरा प्रचंड रडताना दिसली. बाप्पाला निरोप देताना चिमुकलीच्या डोळ्यातून जणू सागर ओसंडत होता.
बालकलाकार मायरा वैकुळच्या घरगुती बाप्पाचे काल विसर्जन झाले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं. मायराच्या अधिकृत ससोहळ मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या घरगुती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. यामध्ये विसर्जनाचा देखील व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मायरा रडत म्हणतेय कि, ‘देवबप्पा, का रे सोडून गेलास मला..? रागावलास का माझ्यावर..? खरं सांगू आता तुझी खूप आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप मोदक व लाडू खाऊ घालेन, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतेय’.
मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहेत. लहान मुलांचे आणि बाप्पाचे खरोखरच एक वेगळे नाते असते हे मायराचा व्हिडीओओ पाहून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. दरम्यान मायराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती ‘निरजा एक नई पेहचान’ या हिंदी मालिकेत काम करताना दिसत आहे. मायरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.