Madhavi Nimkar | मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे माधवी निमकर. खलनायकाची भूमिका साकारून तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. सध्या ती सुख म्हणजे काय असते या मालिकेत खलनायकाचे पात्र निभावात आहे. या मालिकेत तिच्या शालिनी नावाचे पात्र प्रचंड गाजले आहे. अभिनयासोबत माधवी ही तिच्या फिटनेससाठी सौंदर्यामुळे देखील खूप चर्चेत असते. तिच्या फिटनेसकडे देखील ती खूप चांगले लक्ष देत असते. तिचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून सगळेच तिच्यावर फिदा होतात.
परंतु लोकप्रिय असल्यासोबत असतील अनेकवेळा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. नुकतेच माधवीने माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल आणि ट्रोलींगबद्दल देखील तिने सांगितले. त्यावर माधवी म्हणाली की, “माझ्या बाबत असेही म्हटले जाते की, ही तिची बॉडी नकली आहे. तिने लीपोसेक्शन केला आहे. हिने हे सगळं खोटे लावले आहे. कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. अशा कमेंट आणि लोक बोलताना मी ऐकल आहे.”
पुढे ती म्हणाली की, “हे ऐकून माझं असं झालं की ठीक आहे. तुम्हाला तसं वाटत असेल तर ठीक आहे. पण माझ्याजवळच्या माणसांना माहित आहे की, मी यासाठी किती मेहनत घेतलेली आहे. हे सगळं तुम्ही कमावलेल आहे. मला कौतुक या गोष्टीचा वाटतं की, माझी फिगर इतकी कमाल दिसते की लोकांना ते खोटं वाटतं.”
या आधी तिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत काम केले आहेत. त्याचबरोबर हम तो तेरे आशिकी या मालिकांमध्ये काम केलेले आहे. त्याचप्रमाणे ती पावनखिंड या चित्रपटात देखील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली आहे.