हॅप्पी बर्थडे निरू; मधुराणीने ऑनस्क्रीन लेकाला BTS फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेत अभिषेक ही भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच अरुंधती हि भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता निरंजन कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून निरंजनची ऑनस्क्रीन आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मालिकेच्या पहिल्या दिवसापासून मधुराणी आणि निरंजन यांचं चांगलं बॉण्ड राहिलं आहे. त्यामुळे अनेकदा दोघे एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. मधुराणीने आपल्या लेकाच्या वाढदिवसासाठी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

ही इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट आहे. मधुराणीने तिचा आणि निरंजनचा एक बिहाइंड द सीन फोटो तिच्या या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि सोबत तिने लिहिलं आहे कि, ‘हॅपी बर्थडे निरू… तुला माहित आहे, तू माझा फेव्हरेट आहेस’.

मधुराणीच्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून या फोटोतून निरंजन आणि तिचे असणारे प्युअर बॉण्ड स्पष्ट दिसून येत आहे. सोशल मीडियावर विविध पोस्ट, व्हिडीओ शेअर करून निरंजन साकारत असलेल्या अभि या पात्रावर प्रेम करणारे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे प्रेक्षक त्याला शुभेच्छा देत आहेत.