हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून अरुंधती हि मध्यवर्ती भूमिका साकारत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात मधुराणी प्रभुलकर हि आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. नुकतीच तिने मालिकेतील छोटीशी मनू म्हणजेच बालकलाकार जान्हवी हरिसिंघानी साठी एक पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होते आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मनुची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार जान्हवीचे भरभरून कौतुक केले आहे. मधुराणीने या पोस्टमध्ये छोट्या जान्हवीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘मनू , अर्थात जान्हवी… काय सुंदर काम करते. आणि रोज आम्हाला थक्क करत असते जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी…!’
पुढे लिहिलंय, ‘ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा, प्रेम, patience, लगन हे सगळं अवाक करणारं आहे. मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. We are blessed to have her in team AKKK’. बालकलाकार जान्हवी हरिसिंघानीबद्दल अधिक सांगायचं तर, याआधी तिने कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत गीता हि भूमिका साकारली होती. यानंतर आता ती ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मनू हि भूमिका साकारत प्रेक्षकांचे प्रेम मिळवते आहे.