हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे कायम चर्चत असतात. विविध कारणांमुळे त्यांची चर्चा हि होतंच असते. आजपर्यंत मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. गेल्या काही काळापासून महेश मांजरेकर त्यांच्या मुलामुळे फार चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या मुलांबाबत अतिशय मोठे वक्तव्य केले आहे आणि या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकतीच नामवंत वाहिनीला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी समलिंगी संबंधावर भाष्य केलं आहे. मराठी प्रेक्षक समलिंगी संबंधांवर आधारित चित्रपट पाहण्यास तयार आहेत का..? असा सवाल त्यांना विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे कि, ‘आपण मराठी प्रेक्षकांना का कमी लेखतो..? ते समजूतदार, हुशार, आणि पुरोगामी आहेत. त्यांना समाजात त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे ते माहीत आहे. खरे तर यापूर्वी मराठी चित्रपटांमध्ये असे बरेच प्रयोग झाले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ते अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी तयार आहेत’.
पुढे म्हणाले कि, ‘आपण प्रत्येक नातेसंबंध स्वीकारले पाहीजेत. जेव्हा लोक ही नाती स्वीकारायला तयार होत नाहीत तेव्हा अनेक समस्या वाढतात आणि त्यातून आत्महत्यासारखे प्रकार घडतात. आज जर माझा मुलगा मला येऊन मला म्हणाला की तो समलिंगी संबंधात (गे) आहे तर ते मी स्वीकारेन. कारण ते त्याचं आयुष्य आहे. ही त्याची निवड आहे. एवढचं नाही जर माझ्या मुलीनेही मला हेच सांगितलं तरी मी स्वीकारने. कारण मला त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यायचं आहे’. महेश मांजरेकरांच्या या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे.