‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला मलायका अरोराची हजेरी; श्रेया बुगडेला पाहताच म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. या वाहिनीने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच झी मराठी वाहिनीचा यंदाचा उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वातील अनेक तारे उपस्थित होते. ज्यामध्ये बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोराचा समावेश आहे. यंदाच्या झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यासाठी मलायका आवर्जून उपस्थित राहिली होती. दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा जेव्हा झी मराठीच्या सोहळ्यासाठी तयार होऊन व्हॅनिटीतून बाहेर पडली, तेव्हा तिच्यासमोर श्रेया बुगडे होती. यावेळी मालयकाने श्रेयाला पाहून हॅलो म्हटले आणि गोड स्मितहास्य दिले. मराठमोळी श्रेया बुगडे आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय हा व्हिडीओ श्रेया बुगडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच मलायकाच्या भेटीचा तिने आनंद देखील व्यक्त केला आहे.

श्रेया बुगडेने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी तयार होताना दिसत आहे. त्याचवेळी मलायका समोरुन चालत येते. सोनेरी रंगाची साडी, साजेसा शृंगार केल्याने मलायका फारच सुंदर दिसत आहे. यावेळी मलायका श्रेयाला पाहून हॅलो म्हणते तर श्रेयाही तिच्याकडे पाहून हसते. हा व्हिडीओ शेअर करताना श्रेयाने लिहिले, ‘जेव्हा मलायका अरोरा तुम्हाला हॅलो म्हणते. कालची रात्र खूप भारी होती. ती किती छान आहे’. झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे प्रकाशझोतात आली. या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे आज ओळखीचा चेहरा आणि आघाडीच्या हास्य अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.