घटस्फोटानंतर करवा चौथ कुणासाठी..? मानसी नाईकच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा सवाल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच उत्तम नृत्यांगना आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत मानसीने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले. त्यामुळे मानसीचा प्रत्येक वयोगटात चाहता वर्ग आहे. शिवाय मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिचे फॉलोवर्सदेखील खूप आहेत. नुकतीच करवा चौथ व्रतानिमित्त मानसी नाईकने खास सौभ्यावती लूक केला होता आणि सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. ज्यावरून काहींनी तिला ट्रोल केले आहे.

https://www.instagram.com/reel/CzI9-6uKGXf/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री मानसी नाईक मध्यंतरी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे फार चर्चेत होती. मानसी आणि प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये प्रेमविवाह केला होता. मात्र पुढे जाऊन त्यांच्यामध्ये काही मतभेद निर्माण झाले आणि दोघेही विभक्त झाले. मानसी आणि प्रदीप यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. दोघांनीही एकमेकांवर आरोप केले होते. त्यामुळे हे प्रकरण फार गाजले. अशातच घटस्फोटानंतर मानसी नाईकने करवा चौथ लूक शेअर केला होता. ज्यामध्ये मानसी लाल साडी आणि साज शृंगारात अत्यंत सुंदर दिसत आहे.

मानसीने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला हे व्रत कुणासाठी केलेस..? असे प्रश्न विचारून ट्रोल केले आहे. एकाने तर लिहिलं, ‘घटस्फोटानंतर करवा चौथची नाटकं कशाला..?’ आणखी एकाने म्हटले, ‘ज्याला सोडून दिलं.. त्याच्यासाठी हे नटणं, उपवास करणं कशाला..?’ नेटकऱ्यांच्या या प्रश्नांवर मानसीने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट साजशृंगार करून मानसी खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.