Manasi Naik | अभिनेत्री मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि नेहमीच ती चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट असेल तर कधी तिच्या पोस्टच्या कॅप्शनवरून ती चर्चेचा भाग बनत असते.
नुकतेच मानसीने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि तिने काळया रंगाची साडी नेसली आहे तसेच मराठमोळा लूक केला आहे. तिने कापली चंद्रकोर, हातात बांगड्या तसेच गळ्यात चोकर घातलेला आहे. या संपूर्ण लुकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर हे मराठमोळे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिच्या कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, आयुष्य असच हसत खेळत राहावं दुसऱ्या युजरने म्हटले आहे की सुंदर दिसत आहे. अशा अनेक प्रकारे तिचे चाहते तिच्या पोस्टवर कमेंट करत आहे.
मानसी नाईकने 19 जानेवारी 2021 मध्ये प्रदीप खरेरा याच्याशी लग्न केले. त्याआधी त्या दोघांनी एकमेकांना डेट केले होते. परंतु लग्नानंतर त्यांच्यातही वाद झाल्याने त्यांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळी झाले. मानसीने गुलाबी नोट, बाई वाड्यावर, या मस्त चाललंय आमचं या गाण्यावर डान्स केल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली. त्याच प्रमाणे तिने अनेक चित्रपटात देखील काम केले आहे.