‘आम्ही तर काळजात बसणार ते पण..’; मानसीच्या अदाकारीने केलं प्रेक्षकांना घायाळ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना आहे. मानसी जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम अदाकारा. त्यामुळे सोशल मीडियावर मानसी तिच्या अभिनय शैलीपेक्षा जास्त नृत्य शैलीसाठी जास्त चर्चेत असते. आताही तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घायाळ नजर, कातिल हावभाव आणि लक्षवेधी सौंदर्याने ती चाहत्यांना भुरळ घालताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नजरेत तुम्ही बसा.. आम्ही तर काळजात बसणार ते पण रूबाबात.. धन्यवाद युनिव्हर्स.. मी हार मानणार नाही.. वाढणारी चमक आणि उपचार’. या व्हिडिओत मानसीने बॉलिवूड चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘पिंगा’ या गाण्यावर झकास नृत्य सादर केले आहे. शिवाय तिने खणाची नऊवारी साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

मानसी नाईकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानसीचा हा मोहक अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट ईमोजी, फायर ईमोजी शेअर करत मानसीच्या अदाकारीचे कौतुक केले आहे. मानसी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. जो कायम तिच्या पोस्टवर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो.