साडी, बिंदी, बांगड्या, मेहंदी.. करवा चौथसाठी सजली मानसी; नेटकरी म्हणाले,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि तितकीच लोकप्रिय नृत्यांगना आहे. आजवर मानसीने मालिका, चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मानसीचे अल्बम सॉंग देखील कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. मध्यंतरीच्या काळात मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आली होती. दरम्यान मानसी नाईकने पती प्रदीप खऱेरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आज तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

https://www.instagram.com/reel/CzGYVPlKv0n/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

आज जगभरात करवा चौथ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. करवा चौथ हे व्रत सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. अशातच मानसी नाईकने लाल रंगाची साडी, हातात बांगड्या, कपाळावर बिंदी असा साज शृंगार करून काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CzFpx2AKsdJ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

यामध्ये तिने जगभरातील स्त्रीवर्गाला करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सुबह की किरण में सरगी मिलेगी, आज हर पत्नी दुल्हन की तरह सजेगी। इस व्रत से पति की उम्र बढ़ेगी, हर सुहागिन को माता यह आशीर्वाद देंगी। करवा चौथ की हार्दिक शुभकामनाएं!!’

https://www.instagram.com/reel/CzEueJTqkNT/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

याशिवाय तिने लिहिलं, ‘करवा चौथच्या त्यांना शुभेच्छा.. जे पूर्णपणे वेड्यासारखे, खरे आणि प्रामाणिकपणे प्रेमात आहेत’. तसेच आणखी एका पोस्टमध्ये तिने करवा चौथ लूक शेअर करत लिहिले, ‘भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद येवो. करवा चौथच्या या शुभदिनी व्रत पाळणाऱ्या सर्व महिला मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व आशा आणि स्वप्ने सत्यात उतरू दे..’.

https://www.instagram.com/reel/CzERMDqq0zF/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

आणखी एका पोस्टसोबत लिहिलं, ‘तुम्ही आणि तुमच्या सोबतीची साथ कधीच सुटू नये.. तुमचे अंगण आनंदाने आणि हास्याने भरले जावो.. करवा चौथच्या शुभेच्छा!!’ याशिवाय तिने मेहंदीचा देखील व्हिडीओ शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. तर काहींनी मात्र घटस्फोटानंतर हे सगळं कशासाठी..? असा सवाल केला आहे.