‘माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर व्यक्ती..’; मानसी नाईकची ‘या’ अभिनेत्रीसाठी खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक हि सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर मानसी एक उत्तम नृत्यांगना आहे. मानसी नाईकचे ‘वाट बघतोय रिक्षावाला’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले. या गाण्यामुळे खरं मानसी नाईक प्रसिद्धी झोतात आली. गेल्या काही महिन्यांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग राहीली. पण आता तिने एक नवी सुरुवात केल्याचे तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरून दिसत आहे. नुकतीच तिने मराठीसिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिची मैत्रीण भार्गवी चिरमुलेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केलेली हि पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे आणि या सोबत तिने शेअर केलेले कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे. या व्हिडीओ पोस्टच्या कॅप्शनमध्ये मानसीने लिहिलंय, ‘माझी काहीच ओळख नसताना तिने मला मोठे होताना पाहिले आहे. एक अभिनेत्री, कलाकार, मैत्रीण, करिअर गाइड म्हणून तिने मला कायम पाठिंबा दिला. ती कायम माझ्याबरोबर होती. ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती आणि विलक्षण अभिनेत्री आहे. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम! मी आयुष्यात कधीच हार मानणार नाही. लवकरच तिच्यासह मी येत आहे…’.

हि पोस्ट मानसी नाईकने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला टॅग केली आहे. मानसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आणि तिच्यासोबत भार्गवीदेखील दिसत आहेत. या व्हिडिओत बॅकग्राऊंडला कॅमेराचा सेटअप देखील दिसत आहे. शिवाय या व्हिडिओत मानसी नाईकने भार्गवी चिरमुलेबरोबर ‘अधीर मन झाले..’ या गाण्यावर अत्यंत सुंदर असा डान्स केले आहे. या व्हिडीओ पोस्टनंतर आता सोशल मीडियावर मानसी आणि भार्गवी दोघी नेमक्या काय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत..? हा प्रोजेक्ट काय आहे..? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.