‘मोत्यांना तर सवयचं असते विखुरण्याची…’; मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत मानसी नाईकने प्रेक्षकांना अगदी खुळावून सोडलं. तिची अदा, नृत्य आणि सौंदर्य कायम तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करत. मानसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती विविध फोटो, व्हिडीओ आणि रील शेअर करताना दिसते. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींवर चवीचवीने बोलले गेले. पण मानसी या सगळ्यातून भक्कमपणे बाहेर येऊ पाहते आहे. त्यामुळे अनेकदा ती मनातील भावना पोस्टच्या माध्यमातून शेअर करताना दिसते.

https://www.instagram.com/p/Cvd86EPKmdd/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसी नाईकने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका वहीत काहीतरी लिहिताना दिसते आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते, सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची… कधीतरी धागा बनून पहा.. आयुष्य सुंदर वाटेल. श्री स्वामी समर्थ!! वाट पाहत आहे… धन्यवाद युनिव्हर्स.. मी हार मानणार नाही…. वाढतेय, चमकतेय आणि बरी होतेय’.

अभिनेत्री मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरासोबत लग्न केले होते. प्रदीप पेशाने बॉक्सर आहे. काही काळ रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्यात काही बिनसलं आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. आता प्रदीप आणि मानसी एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. या दरम्यान मानसीला प्रचंड मनस्ताप आणि ट्रोलिंग सहन करावे लागले होते. यातून आता कुठे ती बाहेर पडतेय असे दिसत आहे. या सगळ्यात मानसीच्या चाहत्यांनी नेहमीच तिच्या निर्णयाचे समर्थन केल्याचे दिसले.