‘.. जो चुकला त्याला ठोकला’; महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम 376’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

Kalam 376

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. सचिन धोत्रे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाची … Read more

इंदू डार्लिंगच्या 75’व्या वाढदिवसाला कोण कोण येणार..? ‘झिम्मा 2’चा टिझर रिलीज

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या भीषण कलाकानंतर चित्रपटगृहात कल्ला करणारा ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलीच भुरळ घातली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती ‘झिम्मा २’ या चित्रपटाची. बस… वाट पाहण्याचे दिवस संपायला आता काहीच दिवस बाकी आहेत. कारण लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ येतो आहे. नुकताच या … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर संवेदनशील कथानक असलेल्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

8 Don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका महत्त्वाच्या आणि संवेनशील विषयावर आधारलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर … Read more

माझं परमभाग्य..!! दुर्गे दुर्गेश्वरीच्या मंडपात ‘धर्मवीर 2’च्या शूटिंगचा मुहूर्त संपन्न; प्रसादने शेअर केला Video

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हा उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेविश्वात आघाडीवर कार्यरत आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेला विक्रम हा थक्क करणारा होता. यानंतर आता प्रेक्षक ‘धर्मवीर भाग २’ची प्रतीक्षा करत आहेत. ‘धर्मवीर’ या चित्रपटातून ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलघडण्यात … Read more

‘.. अन टेंभी नाका स्तब्ध झाला’; धर्मवीर दिघेंच्या वेशभूषेत प्रसादने घेतले दुर्गेश्वरी देवीचे दर्शन

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलघडण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतर आता प्रेक्षक ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणादेखील करण्यात आली आहे. दरम्यान ठाण्यातील टेंभीनाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्र उत्सवात … Read more

सिद्धार्थ जाधवने केली नव्या चित्रपटाची घोषणा; वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज

Ulgulan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांनी मन जिंकून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ जाधव आपला सिद्धू कधी झाला काही कळलंच नाही. आज याच आपल्या सिद्धूचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच सिद्धार्थने त्याच्या आगामी चित्रपटाची अर्थात नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या … Read more

‘बोल गं बाई त्याच्याशी..’; ‘नाळ- भाग 2’चा टिझर पाहून जितेंद्र जोशी झाला भावुक

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगली छाप उठवली. या चित्रपटाच्या शेवटी अधुरी राहिलेली गोष्ट आता ‘नाळ भाग २’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि २ टिझर रिलीज झाले आहेत. यातील पहिला टिझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. यानंतर नुकताच या चित्रपटाचा … Read more

‘कदाचित म्हणूनच हे धाडस…’; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Nach Ga Ghuma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात स्त्रीच्या स्वभाव वैशिष्टय़ांवर अनेक टिप्पण्या केल्या जातात. कुणी स्त्रीला माता, जननी म्हणतं तर कुणी तिच्या अन्य रूपांची उपासना करत. काही लोक स्त्रीच्या अस्तित्वाची चेष्टा करतात तर काही मात्र स्त्रीच्या समर्पणाचे पूजन करतात. प्रत्येक माणसाचा स्त्रीच्या असण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कुणाला ती हवीशी तर कुणाला ती नकोशी वाटते. समाजाच्या रहाटगाड्यात स्त्रीविषयीच्या … Read more

Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा

Naal 2 Teaser

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर … Read more

‘दाखवून द्या, वामन कोण आहे..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात संवेदनशील नाते म्हणजे वडिल आणि मुलगा. हे नाते घट्ट बांधून ठेवण्याचे काम आई करत असते. पण त्याच आईमुळे जर नात्यात दुरावा आला तर…? कोणत्याही नात्यात सुसंवाद महत्वाचा. पण संजू आणि त्याच्या बाबांचा तर कधी संवाद झालाच नाही. त्याच्या बाबांची ओळख त्याच्याच आईने लपवली. पण का..? कश्यासाठी..? याच प्रश्नांची उत्तर घेऊन … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

‘दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे…’; शाळेतल्या प्रेमाची आठवण करून देणार ‘रंगीले फंटर’

Rangiley Funter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक … Read more

बाप लेकाच्या नात्याची ‘शॉर्ट अँड स्वीट’ गोष्ट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड … Read more

एकाच चित्रपटातून 16 विनोदवीर घालणार धिंगाणा; ‘एकदा येऊन तर बघा’चा फुल्ल कॉमेडी टीझर व्हायरल

Ekda Yeun Tar Bagha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. एक उत्तम अभिनेता म्हणून तो सर्वांसमोर आला आणि आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिग्गज विनोदवीरांची स्टारकास्ट पहायला मिळणार असून नुकताच याचा टिझर रिलीज झाला … Read more

‘एखाद्या धर्मग्रंथातली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण…’; पृथ्वीक प्रतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र चित्रपटाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नावाजले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनेदेखील एक लांबलचक पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. पृथ्वीकने या … Read more