‘औक्षण.. आशीर्वाद आणि खूप प्रेम..’; MHJ’च्या टीमने साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ … Read more

‘हा महिलांनी नव्हे तर पुरुषांनी पहायचा सिनेमा..’; ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला आहे. दमदार कामगिरीसह ७० कोटींचा आकडा पार करणारी कमाई करत या चित्रपटाने एक वेगळाच विक्रम केला आहे. या चित्रपटाला तमाम महिला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मात्यांनी आता हा चित्रपट पुरुषांनी देखील पहावा असे आवाहन केले आहे. … Read more

छत्रपती शिवरायांच्या पोशाखात असताना सेल्फी का देत नाही..? चिन्मयच्या उत्तराने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सुभेदार’मुळे चांगलाच चर्चेत आहे. दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे. या मालिकेतील सर्व चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत असताना चिन्मय स्वतःला काही बंधने घालून घेतो आणि याबाबत त्याने नुकताच एका … Read more

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये हा क्षण..’

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफिसवर चांगलाच भारी ठरला आहे महिना होऊन गेला आणि तरीही हा चित्रपट मात्र थिएटरमध्ये हाऊसफुल्ल वर हाऊसफुल्ल शो गाजवतोय. नुकतेच मुंबई पोलिसांसाठी ‘बाईपण भारी देवा’चे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या तब्बल १०० मुंबई पोलिसांनी अडीच तास ‘बाईपण भारी देवा’ या … Read more

ॲक्शन थ्रीलरपट ‘अंकुश’मध्ये ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; पहा पोस्टर

Ankush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले “अंकुश” चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज “अंकुश” या बिगबजेट अॅक्शन-थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. पहिल्याच प्रयत्नात आव्हानात्मक भूमिकेचं दीपराजनं सोनं केलं असून, या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. “अंकुश” हा चित्रपट ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. … Read more

धमाल ऑफर ‘त्याच्या’साठी!! ‘बाईपण भारी देवा’ बघा फक्त 100 रुपयांत; सविस्तर जाणून घ्या

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस नुसता दणाणून टाकला आहे. बघता बघता हा चित्रपट महाराष्टाच्या बाहेरही चांगला प्रतिसाद मिळवताना दिसतोय. महिला प्रेक्षकांनी तर या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांची गर्दी दिसते आहे. अजूनही हा चित्रपट थिएटर गाजवतो आहे. अशातच आता सिनेमाच्या … Read more

‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरची युट्युबवर आघाडी; दिग्दर्शकाने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ यातील पाचवे चित्रपुष्प अर्थात आगामी मराठी चित्रपट ‘सुभेदार’ येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वीर पराक्रमाची गाथा या चित्रपटातून आपल्याला भव्य स्वरूपात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा … Read more

‘धर्मवीर 2’मध्ये उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’; खंडेरायाच्या दर्शनानंतर टायटल पोस्टर रिलीज

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला. धर्मवीरच्या या दिमाखदार यशानंतर आता ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच निर्माते मंगेश देसाई, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर … Read more

‘वाघाले घर तर पाहिजेनच..’; ‘टेरिटरी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीजर प्रदर्शित

Territory

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे ‘टेरिटरी’ हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील … Read more

नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटात झळकणार ‘हा’ नवा चेहरा; कोण आहे ही अभिनेत्री..?

Baplyok

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मी मोठा सुपरस्टार होणार… असं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण गावाची वेस ओलांडून मुंबई सारख्या स्वप्ननगरीत येतात. काहींची स्वप्न लवकर पूर्ण होतात तर काही कलाकार मात्र शेवटपर्यंत झिजत राहतात. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कायम अशाच नवोदित मात्र हरहुन्नरी कलावंताच्या शोधात असतात. रॉ टॅलेंटसोबत काम करणे हा जणू त्यांचा छंदचं. आजपर्यंत त्यांनी … Read more

‘आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाव्या लागल्या तरी चालतील, पण…’; ‘सुभेदार’चा रोमांचक ट्रेलर रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ने प्रेक्षकांना इतिहासाच्या अगदी जवळ नेलं आहे. आतापर्यंत या अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या प्रत्येक चित्रपटातून इतिहासाचं एक एक सुवर्ण पण उलघडण्यात आलं. यानंतर आता याच अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तानाजी … Read more

‘अंगावर धोतर- सदरा, डोळ्यावर चष्मा आणि हातात..’; ‘परिनिर्वाण’ चित्रपटात प्रसाद ओक साकारतोय ‘ही’ भूमिका

Parinirvan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणजे प्रसाद ओक. माध्यमातून कायमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसाद सिने विश्वात आपल्या कलेच्या जोरावर घट्ट पाय रोवून उभा आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतो. लवकरच प्रसाद एका नव्या … Read more

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य लवकरच उलघडणार; नेमकं काय दडलं असेल यात..?

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम, भय, वासना, थरार अशा विविध श्रेणीतील कलाकृतींचा विविध प्रेक्षकवर्ग असतो. असाच एक मोठा प्रेक्षक वर्ग रहस्य या श्रेणीचा आहे. तर या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला चित्रबोली क्रिएशन्स निर्मित आणि वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही रहस्यमयी वेबफिल्म लवकरच येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय … Read more

उमेश- प्रियाच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिलाचं प्रयोग झाला हाऊसफुल्ल

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट हे कायम चर्चेत असतात. ही क्युट जोडी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यांची केमिस्ट्री हि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा अतिशय गोड आहे. हीच केमिस्ट्री घेऊन ते पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आहेत. मुख्य … Read more

‘बाप’ आई नसतो, कारण..; ‘बापमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरने केला प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श

Baap Manus

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल ९ महिने आपल्या पोटात एक जीव वाढत असताना आई आणि त्या बाळाचं नातं फुलत असतं. आई आपल्या बाळाच्या सगळ्यात जवळ असण्याचं कारणचं हे आहे कि तीच नातं हे इतरांच्या आधी बाळाशी जोडलं जात. तिची भावनिक नाळ बाळाशी जोडली जाते. आई आणि तिचं मूल या नात्यातली ओढ काही वेगळीच असते. व्यक्त न … Read more