‘आता वेळ झाली’.. दोन जीवांचा प्रेरक प्रवास; दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र मोठ्या पडद्यावर

Ata Vel Zali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. या चित्रपटात ‘माई’ हि भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी साकारली आहे. नेहमीपेक्षा वेगळी मात्र तरीही लक्षवेधी अशी हि भूमिका रोहिणी हट्टंगडी यांनी उत्तम साकारली. या चित्रपटाला आणि त्यांच्या … Read more

‘सुस्साट’ घेऊन येतोय अद्भुत भुतांची बेफाट कॉमेडी; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Sussat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात दगडू म्हणून कल्ला घातलेला प्रथमेश परब, एनर्जीचं कम्प्लिट पॅकेट असलेला आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली विदुला चौघुले हे तिघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धू, प्रथमेश आणि विदुला लवकरच मराठी होणार कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सुस्साट’ … Read more

‘बाईपण भारी देवा’चा सिक्वेल येणार…? केदार शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे जोरदार चर्चा

Baipan Bhaari Deva 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफिसवर भारी पडला आहे. ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पहायला महिला प्रेक्षक वर्गाने मोठी गर्दी केल्याचे आपण पाहिले. महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच गर्दी जमवली. महिन्याभरानंतरही हा चित्रपट अद्याप बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसतोय. … Read more

‘गुलाबजाम 2’मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट; सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता

Gulabjam 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजाम’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयामुळे प्रचंड गाजला होता. साखरेच्या पाकात डुबुक बुडणारा आणि जिभेवर ठेवताच मन आनंदित करणारा ‘गुलाबजाम’ त्याच्या पाककृतीसह प्रेक्षकांच्या मनात उतरला. एक वेगळा विषय आणि वेगळी मांडणी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. शिवाय सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या … Read more

विदर्भातील जंगलाच्या ‘टेरिटरी’ची कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार; पहा पोस्टर

Territory

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने वाघ, बिबट्या यांच्यासारखे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची अशीच थरारक कहाणी १ सप्टेंबरपासून उलगडणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री … Read more

‘बाईपण का भारी हे दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं भारीपण…’; अशोक सराफ यांचं वक्तव्य चर्चेत

Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे सर्वत्र केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या रिलीजला चार आठवडे होऊन गेले पण प्रतिसाद अजूनही दणदणीत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतोय. इतकंच काय तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दरम्यान प्रेक्षक. समीक्षक … Read more

दमदार शुक्रवार!! ‘बाईपण भारी देवा’ थिएटरमध्ये मोफत पाहता येणार; कधी आणि कुठे..? लगेच जाणून घ्या

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजतो आहे. दिनांक ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार आठवडे होऊनही थिएटरमध्ये कल्ला करतोय. या चित्रपटाचं सर्वाधिक क्रेझ महिला वर्गात पहायला मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ पहायला आजही प्रत्येक शोला थिएटरमध्ये गर्दी होतेय.अनेकदा चित्रपटाची तिकीटंदेखील मिळत नसल्याचे … Read more

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक; म्हणाली, ‘खूप खूप खूप..’

Baipa Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला पूर्ण केला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. हि छाप केवळ प्रेक्षकांच्या नव्हे … Read more

माझ्या सुनेच्या मंगळागौरीला गाणं गायला येशील का..?; सावनीने सांगितलं भन्नाट किस्सा

Savaniee Ravindrra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले आहे. या गाण्याची गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. पण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी तिने गायलेल्या ‘मंगळागौर’ गाण्याने महिला वर्गाचा चंगळच लक्ष वेधून घेतला आहे. … Read more

‘धोती, सदरा, कोट आणि टोपी..’; आगामी चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे साकारणार ‘ही’ भूमिका

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही टीआरपीच्या बाबतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या केवळ घरात नव्हे तर मनामनांत जागा मिळवली आहे. दरम्यान मालिकेत ‘दादा काका’ हे गंभीर मात्र अत्यंत महत्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत अभिनेते उदय टिकेकर दादा … Read more

‘सुभेदार’ तान्हाजींनी घेतली शपथ ‘कोंढाणा आणीन स्वराज्यात…’; नवे पोस्टर रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवराज अष्टकातील चार चित्रपटांनी आधीच प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य इतिहासाचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडवले आहे. यानंतर आता शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातले आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक पर्वातील हा पाचवा सिनेमा म्हणुन प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे शुर मावळे … Read more

मंजुळेंच्या ‘सैराट’वर शिंदेंचा ‘बाईपण..’ भारी पडणार; कमाईचा आकडा नवा विक्रम करणार..?

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार … Read more

अभिनेता मंगेश देसाई साकारणार रावडी भाई; ‘अंकुश’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

Mangesh Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटात काम करताना दिसला नाही. पण आता लवकरच पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी मंगेश देसाई सज्ज झाले आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘अंकुश’मध्ये अभिनेता मंगेश देसाई अत्यंत दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या भूमिकेचे पहिले वहिले आणि अत्यंत लक्षवेधी असे मोशन पोस्टर नुकतेच … Read more

ईद्धनु तिन्नू!! मी स्वतःला भाग्यवान समजतो.. म्हणत अभिनेत्याने शेअर केला शुटिंगवेळी घडलेला दैवी किस्सा

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अनिरुद्ध या पात्राला न्याय देणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच किस्से, अनुभव शेअर करताना दिसतात. आज त्यांनी स्वतःच्या एका चित्रपटाबद्दलची खास आठवण शेअर ऐकली आहे. ‘रेणुका आई लय भारी’ हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे आणि या … Read more

‘बाईपण भारी देवा’ने नुसतं यश दिलं नाही तर..; चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहून निर्मात्यांनी व्यक्त केला आनंद

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून संपूर्ण टीम भारावली आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय आणि थिएटर गाजवतोय. मराठी सिनेमा म्हणून ‘बाईपण भारी देवा’ला मिळालेलं यश खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून सर्व स्तरांवरून सिनेमाचं कौतुक होत आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकताच चित्रपटाच्या … Read more