‘गुलामगिरीच्या अंधारात… उदय एका थोर क्रांतिसूर्याचा’; ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Satyashodhak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण समाजाला ज्ञानतेजाने उजळून टाकण्याचे काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य फार मोठे आहे. अज्ञानाला ज्ञानाचे महत्व पटवून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सत्यशोधक’ असे आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील अडीअडचणी आणि त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी कशी केली..? … Read more

‘खरा तो एकची धर्म…’; ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे यांचे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Mahesh Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. चित्रपटातील सेट, कलाकारांचा लूक ते कथा, संवाद आणि सादरीकरण याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे. दरम्यान ‘श्यामची आई’ चित्रपटात ‘खरा … Read more

Mi Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असणारे नाटक सातासमुद्रापार इतिहास रचायला सज्ज

Mi Nathuram Godse Boltoy

Mi Nathuram Godse Boltoy | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अनेक नाटक अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात त्यांचे एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या शरद पोंक्षे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक चालू आहे. आणि … Read more

‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचे कमालीचे टिझर रिलीज झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा सात बायका आणि त्यांच्या धम्माल टूरची गोष्ट पहायला मिळणार आहे. ‘फक्त यावेळी लेडीज गॅंगमधील २ मेम्बर नवीन आहेत. तर ही टूर घेऊन जाणारा तो म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर … Read more

‘हा त्यांचा शेवटचा सिनेमा..’; ‘सूर लागू दे’च्या पोस्टर लाँचवेळी विक्रम गोखलेंच्या आठवणीत मांजरेकर झाले भावुक

Sur Lagu De

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट,मालिका, रंगभूमी यांसारख्या विविध मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचं काही महिन्यांपुर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व हादरून गेले. त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली. दरम्यान विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या … Read more

‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई- बाबा

Sonali Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अटकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय या चित्रपटात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. आता हे नवोदित कलाकार कोण..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..? तर तुमच्या प्रश्नाचं … Read more

‘मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकच पाहत नाहीत, त्यामुळे…’; गौरव मोरेचे विधान चर्चेत

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमिक कार्यक्रम म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ते सादर करत असलेली प्रहसने जितकी खळखळून हसवतात तितकीच सामाजिक संदेश देतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरे प्रकाश झोतात आला. आपल्या कमालीच्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा … Read more

मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करत आला ‘झिम्मा 2’चा नवा टीझर; होऊदे वायरल!… धुडूsssम!

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा नवाकोरा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात पुन्हा एकदा दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज … Read more

‘तीन अडकून सीताराम’ ओटीटीवर रिलीज; घरबसल्या जाणून घ्या ‘त्या’ रात्री काय घडलं..?

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ हा हटके नावाचा चित्रपट पारदर्शिता झाला. २९ सप्टेंबर रोजी ‘दुनिया गेली तेल लावत’ म्हणत या चित्रपटाने थिएटरमध्ये समावेश केला. खरतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. पण तरीही अत्यंत वेगळ्या शीर्षक आणि टॅगलाईनमूळे हा चित्रपट चर्चेत राहिला. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची माधुरी दीक्षितच्या चित्रपटात वर्णी

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळ महाराष्ट्रीयन असल्यामुळे तीचं मराठी सिनेविश्वासोबतदेखील घट्ट नातं आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असतानाही ती मराठी सिनेसृष्टीसोबतचे नाते कायम सांभाळताना दिसते. नुकतीच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने नव्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक आणि या चित्रपटाची निर्मिती माधुरी व तिचे पती डॉ. … Read more

Jhimma 2 Cast – आनंदाच्या ट्रीपमध्ये नव्या मेंबर्सची एंट्री; ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर व्हायरल

Jhimma 2 Cast

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2 Cast) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात दाखल होणार आहे. पण तत्पूर्वी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’चा प्री टिझर अलीकडेच रिलीज झाला. ज्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आगामी ट्रिपचे … Read more

‘धैर्य आणि न्यायाच्या शक्तिशाली कथनाची झलक’; ‘जयभीम पँथर’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

Jaibhim Panther

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद … Read more

माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा; सोशल मीडियावर शेअर केले मोशन पोस्टर

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळची महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करत असतानासुद्धा तिची मराठीसोबत जोडलेली नाळ काही तुटली नाही. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असताना मराठी सिनेसृष्टीसोबत असणारे नाते तिने कायम सांभाळले आहे. मराठी सिनेसृष्टीत तिने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर आता तिने आणखी एका चित्रपटाची … Read more

ती येतेय..!! ‘निळावंती’चे गूढ रहस्य उलगडणार..? पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nilawanti

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध कथानकाच्या वेगवेगळ्या कलाकृती कायम प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. यामध्ये कॉमेडी, ऍक्शन, फॅमिली ड्रामा, हॉरर या जॉनरच्या चित्रपटांचा विशेष चाहता वर्ग आहे. याशिवाय रहस्यमय अर्थात सिक्रेट कथानकांचा देखील फार मोठा चाहता वर्ग आहे. अशा प्रेक्षकांसाठी लवकरच एक आगळी वेगळी रहस्यमय कथा घेऊन ‘निळावंती’ येतेय. एका गूढ कथेवर आधारित ‘निळावंती’ या चित्रपटाची अलीकडेच … Read more

दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; उलगडणार ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची गाथा

Digpal Lanjekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ या चित्रपट मालिकेमूळे कायम चर्चेत असतात. या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत ५ चित्रपुष्प श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहेत. या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचा सुवर्ण इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. यानंतर आता … Read more