‘बटरफ्लाय’ने करून दाखवलं; मराठी सिनेमाला तिसऱ्या आठवड्यातही मिळतोय उदंड प्रतिसाद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या ‘बटरफ्लाय’ या मराठी सिनेमाचं असं कौतुकच केलं आहे. आज तिसऱ्या आठवड्यामध्येसुद्धा पुण्यामध्ये या चित्रपटाचे शो हाउसफुल चालू आहेत. यावरून चित्रपटाला मिळणारे प्रेम लक्षात येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Butterfly Film (@butterflymarathifilm)

मराठी चित्रपटांच्या गर्दीत इंग्रजी चित्रपटांच्या लाटेत आणि अतिशय मोठ्या अशा हिंदी चित्रपटांच्या तोडीला हा चित्रपट उभा राहिला. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा माऊथ पब्लिसिटी वर म्हणजेच एकाने दुसऱ्याला सांगून वाढत जातो. अशा पद्धतीने मराठीला सिनेमांना थिएटर मिळणं ही फार महत्त्वाची बाब असते.

प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल बोलताना, ‘आवर्जून बघावा असा सिनेमा’, ‘खूप वर्षांनी असा सिनेमा मराठीत आला’, ‘आम्ही परत परत पाहणार’, ‘प्रत्येक बाईने प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक कुटुंबाने पहायलाच हवा’, ‘आजच्या धकाधकीमधे आणि भपकेबाज गोष्टी चालू असताना हा चित्रपट सुखावून जातो’, ‘तुम्हाला सगळी बक्षीसं मिळायला हवी’, ‘प्रत्येकाला आपला वाटेल आपल्याशी रिलेट होईल आपण आपलीच गोष्ट पाहतोय असं वाटेल’ यांसारख्या अनेक सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, देत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhura Abhijeet Welankar-satam (@madhurawelankarsatam)

निदान महाराष्ट्रात तरी, जेव्हा मल्टिप्लेक्स म्हणतो तेव्हा अनेक स्क्रीन असतात त्यातली निदान एक स्क्रीन महाराष्ट्रातल्या मराठी सिनेमांसाठी राखीव असली पाहिजे. कारण कुठलाही मोठा चित्रपट हिंदी, इंग्रजी आला की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. मराठी प्रेक्षकांना पाहता येईल अशा वेळा उपलब्ध होत नाहीत. मराठीचा तिकीट दर कमी असतो आणि हिंदी, इंग्रजीचा जास्त. त्यामुळे ही गत होते. परंतु प्रेक्षक येतात का..? तर हो.. प्रेक्षक येतात!! चांगलं दाखवलं, चांगलं केलं तर त्याची दखल नक्कीच घेतली जाते. याचं उत्तम उदाहरण ‘बटरफ्लाय‘ हा मराठी चित्रपट ठरला आहे. असेच उत्तम उत्तम चित्रपट मराठीत येवो आणि मराठीला थिएटर्समध्ये दाखल होवोत अशी प्रेक्षकांची ईच्छा व्यक्त केली आहे.