मयुरी वाघने पूर्ण केलं नव्या घराचं स्वप्न; सोशल मीडियावर शेअर केले वास्तुशांतीचे फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मयुरी वाघने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मयूरी वाघ सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. आताही तिने याच माध्यमातून नवं घर खरेदी केल्याची माहिती दिली आहे. अधिकृत ससोहळ मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने नव्या घरातील गृहप्रवेश आणि वास्तुशांतीचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री मयुरी वाघने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. तिच्या नव्या घरात गृहप्रवेश आणि वास्तुशांती पुजादेखील संपन्न झाली आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं’. या कॅप्शनसोबत मयुरीने नवीन घर, नवी सुरूवात, कृतज्ञता, आनंदी आयुष्य असे काही हॅशटॅग्स वापरले आहेत.

गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी मयुरीने पिवळ्या रंगाची साडी, मॅचिंग बांगड्या, कानात झुमके परिधान करत सुंदर लूक केला होता. मयुरीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मयुरीने नवीन घर खरेदी केल्यावर कलाविश्वातील मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मयुरी वाघच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, तिने २०१७ साली अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न केलं होतं. पण पुढे काही वर्षांतच ते वेगळे झाले. यानंतर आता पियुषने अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं आहे.