‘या’ मराठी अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार जोड्या कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही जुन्या काही नव्या तर काही बनत असलेल्या या जोड्या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटना ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशीने तिच्या हक्काच्या माणसासोबत फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

अभिनेत्री मीरा जोशीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. उरणच्या सुमद्र किनाऱ्यावर मीराने तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमॅंटिक फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मीराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तो नक्की कोण आहे..? हे सांगणे कठीण आहे. पण त्याच्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेत्री मीरा जोशीचं हे रोमँटिक फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मीराने जांभळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. बॉयफ्रेंडसोबतचे हे रोमॅंटिक फोटो शेअर करताना अभिनेत्री मीरा जोशीने ‘ड्रंक इन लव्ह’ असं कॅप्शन दिलं आहे. मीराने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या फोटोंवर तिचे चाहते, तसेच काही कलाकार मंडळी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.