‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्यासोबत मराठी अभिनेत्री झळकणार; म्हणाली, ‘मी स्वप्नातही विचार केला नव्हता…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणत्याही वशिल्याशिवाय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. यामध्ये आता टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशीच्या नावाचादेखील समावेश झाला आहे. येत्या काळात ती लवकरच हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध चेहऱ्यासोबत काम करताना दिसणार आहे.

‘दार उघड बये’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मीरा जोशी हिंदी कला विश्वातील लोकप्रिय चेहरा शारिब हाशमीसोबत काम करताना दिसणार आहे. ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘तरला’ यांसारख्या चित्रपटात शारिबने दमदार अभिनय करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यानंतर आता शारिब हाशमी आणि मराठी अभिनेत्री मीरा जोशी मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याबाबत मीराने स्वतः सोशल मीडिया हॅण्डलवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

मीराने ही पोस्ट शेअर करताना लिहिलंय कि, ‘२०२० मध्ये दरबानमध्‍ये त्यांचे काम पाहिल्‍यानंतर मी त्यांचं कौतुक करत मेसेज पाठवला होता. त्यांनीही कृतज्ञतेने व नम्रतेने मला रिप्लाय केला होता. त्यावेळेस मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एके दिवशी मी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करेन. तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावं! तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे!’ मीराच्या या पोस्टवर शारिबने कमेंट करत लिहिले कि, ‘तुझ्या या शब्दांसाठी धन्यवाद मीरा, तू अप्रतिम आहेस’. दरम्यान या पोस्टवर नेटकरी कमेंट करत मीराला मिळालेल्या संधीबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.