Mi Nathuram Godse Boltoy | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अनेक नाटक अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात त्यांचे एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या शरद पोंक्षे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक चालू आहे. आणि या नाटकाला प्रेक्षकांची देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकांमध्ये शरद पोंक्षे हे मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाचा प्रतिसाद पाहून या नाटकाचा आता अमेरिकेने दौरा आयोजित करण्यात आला आहे.
प्रदीप दळवी यांनी लिहिलेले आणि विनय आपटे यांनी दिग्दर्शन केलेले मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक काही काळापूर्वी वादात अडकल्यामुळे थांबवावे लागले होते. परंतु त्यानंतर आता तब्बल सहा वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगभूमी वर आले आहे. आणि या नाटकाचे पन्नास प्रयोग देखील पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे नाटकातील सगळ्याच कलाकारांना खूप आनंद होत आहे.
महाराष्ट्रामध्ये नाटकाची जादू दाखवल्यावर हे नाटक आता सातासमुद्रापार त्याची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेले हे नाटक अमेरिकेत दौरा करण्यासाठी सज्ज झालेले आहे. हे नाटक 2024 मध्ये अमेरिकेमध्ये नाटकाचा दौरा चालू करणार आहे.
सातासमुद्रापार इतिहास रचवण्यासाठी सज्ज – Mi Nathuram Godse Boltoy
मागील अनेक वर्ष शरद पोंक्षे या नाटकात मुख्य भूमिकेत आपल्याला दिसत आहेत. हे नाटक करत असताना त्यांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागले होते. त्यांना धमकीचे फोन देखील आले होते. परंतु त्यांनी आणि त्यांच्या नाटकाच्या पूर्ण टीमने अजिबात न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरू ठेवले होते. या नाटकाने 1000 प्रयोग पूर्ण झाले आहेत .परंतु अचानक 2017 मध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय (Mi Nathuram Godse Boltoy) या नाटकाचे प्रयोग थांबविण्यात आले होते. परंतु आता आनंदाची गोष्ट म्हणजे या ऑक्टोबर महिन्यापासून या नाटकाचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. या नाटकाला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच हे नाटक आता सातासमुद्रापार इतिहास रचवण्यासाठी सज्ज झाले आहे.
हेही वाचा- ‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष