‘आई कुठे काय करते’ मालिकेचे 1000 भाग पूर्ण; अनिरुद्धने शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसला. आता या मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करत यशाची आणखी एक पायरी चढली आहे. ज्याचा आनंद मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर सेलिब्रेट केला आहे. मालिकेच्या टीमने शूटिंग सेटवर केक कापून हा आनंद साजरा केला आहे. ज्याचा व्हिडीओ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे.

मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय, ”’श्रद्धा आणि सबुरी”…. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत. 7.12.2019 या मालिकेचे शूटिंग सुरू केलं, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण वाटत नक्की होतं की ही सिरीयल खूपच लोकांना भावेल, खूप आवडेल हि serial, त्याचं मुख्य कारण म्हणजे या सिरीयलच्या नावामध्ये “आई “या शब्दाचा उल्लेख आहे, आणि दुसरं कारण होतं राजन जी शाही, आपल्या क्रिकेटच्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर आहे म्हटल्यानंतर आपली टीम भारीच खेळणार आणि जिंकणार, असा एक वेगळा कॉन्फिडन्स खेळाडूंना असेल ना, तसाच
आमच्या या “आई कुठे काय करते”च्या टीम मध्ये राजनशाही आहेत, राजन शाही एक मराठी सिरीयल करतायेत म्हटल्यावर ती उत्कृष्टच होणार, याची एक वेगळीच खात्री सगळ्याना होती, डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चे सर्वेसर्वा राजन जी, हे आम्हाला प्रोड्युसर लाभले होते, नमिता वर्तक म्हणजेच कमलाकर नाडकर्णी यांची कन्या, जिने खरंतर मला या सिरीयल साठी माझी “अनिरुद्ध देशमुख” या पात्रासाठी निवड केली, उत्कृष्ट इतर सगळे कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शनाची टीम, उत्कृष्ट सेटिंग, उत्कृष्ट लेखन, सगळंच या सिरीयल मधलं भारी होतं, स्टार प्रवाह चॅनल ने सुद्धा सिरीयलचे प्रमुख उत्कृष्ट केले होते, पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये ही सिरीयल बसली’.

पुढे लिहिलंय, ‘खरंतर मी एक odd man out होतो, मी जे कॅरेक्टर करत होतो अनिरुद्ध देशमुख नावाचं, ते सुद्धा odd man out आहे, पहिल्यांदा ज्यावेळेला नमिताने माझी राजन शाही यांच्याशी ओळख करून दिली, त्यावेळेला माझ्याविषयी त्यांच्या डोळ्यांमध्ये मला फार काही confidence दिसला नाही, तसं ते मला काही बोलले नाहीत तरी, पहिल्या भेटीत मला ते जाणवलं होतं, पण त्यांचा नमितावर खूप कॉन्फिडन्स होता आणि तिच्यावर खूप विश्वास होता, आणि म्हणून खरंतर माझं कास्टिंग या इतक्या भारी रोल साठी झालं, “ श्रीमोई “ नावाची बंगाली मालिके चं हे सुरुवातीला रूपांतरण होतं, त्यामध्ये जो अनिरुद्ध देशमुख होता, तो अगदी भारदस्त व्यक्तीमहत्त्व होतं, त्याचे काही episodes मला राजनजींनी पाहायला सांगितले होते, ते भाग पाहिल्यानंतर मी जरा घाबरलोच होतो, अमरीश पुरी सारखी त्याची पर्सनॅलिटी होती, team ने मला सांभाळून घेतलं, एक हजार एपिसोड नंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहेत, त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला, या आई कुठे काय करते च्या टीमने. DKP राजन जी, स्टार प्रवाह पासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉय पर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे! आज सेटवर छान हवन पूजा झाली, 1000 एपिसोड चा केक आज आम्ही कापला’.