‘मन चिंब पावसाळी…’; मीरा जगन्नाथचं घायाळ करणारं मान्सून फोटोशूट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या बेधडक अंदाज आणि स्पष्ट वक्तेपणामुळे बिग बॉस मराठी सीजन ३ गाजवणारी मीरा जगन्नाथ प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असेल. या शोनंतर मीरा अशी काही प्रकाशझोतात आली कि बस्स!! विविध मालिकांमध्ये तिने विविध ढंगाच्या सहाय्यक भूमिका रंगविल्या आहेत.

दरम्यान मीरा जगन्नाथ हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यामुळे ती कायम विविध फोटो आणि लूक शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आताही तीच असंच मान्सून स्पेशल फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तीच नवंकोरं फोटोशूट शेअर केलं आहे. हे मान्सून स्पेशल फोटोशूट आहे आणि त्यामुळे या फोटोंमध्ये मीरा निसर्गाच्या सानिध्यात मनमोहक अंदाजात दिसते आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मीरा जगन्नाथ या फोटोंमुळे पुन्हा एकदा स्पॉटमध्ये आली आहे. या फोटोशूटसाठी मीराने ऑफ व्हाईट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली दिसत आहे. शिवाय तिच्या कातिलाना पोझ भल्याभल्याना घायाळ करणाऱ्या आहेत.

विविध निसर्गरम्य लोकेशन्सवर हे फोटोशूट करण्यात आलं आहे. उंच टेकडीवर, झऱ्यात भिजताना असे अत्यंत सुंदर पद्धतीने हे फोटोशूट केले आहे. त्यामुळे मीराने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून व्हायरल होत आहेत. मीराचा साडीतील बोल्ड अंदाज आणि मादकता चाहत्यांना घायाळ करते आहे.

मीराच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. हार्ट ईमोजी, फायर ईमोजी यांसह अनेक प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘कमाल’, ‘सौंदर्यवती’ आणि यांसह अनेक शब्दांच्या माध्यमातून नेटकरी मीराच्या देखणेपणाचे कौतुक करत आहेत.