हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या मिताली इंडोनेशियामधील बाली येथे फिरायला गेली आहे. दरम्यान येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावर तिने बिकिनीमध्ये फोटोशूट केले होते. जे नेहमीप्रमाणे तिने सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला संस्कृतीचे धडे देण्यास सुरुवात केली. तर काहींनी गलिच्छ भाषेत तिला ट्रोल केले. यानंतर मितालीने आता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.
बिकिनीत फोटोंमुळे ट्रोल झाल्यानंतर मितालीने समुद्रकिनारी साडीतील पोज देत शूट केले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले. मितालीने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले आहे कि, ‘एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, मी काहीही घातलं तरीही मी माझ्या मूळ संस्कृतीला कधीच विसरणार नाही. अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा’. मितालीच्या या व्हिडीओवर पुन्हा ट्रोलर्सने टीकांचा मारा केला असता कमेंट बॉक्समध्येही अभिनेत्रीने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले.
यात एका महिला नेटीझनने लिहिले आहे कि, ‘मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या फार पलिकडे आहे .. नका असे प्रयत्न करू…. बरं तू बिकिनी घाल की नको घालू हा सुद्धा मुद्दा नाही… तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर दुसऱ्या कुणी तिकडे तोंड उघडायची गरज देखील नाही….पण फक्त कुणी तरी काही तरी प्रोजेक्ट द्यावा ह्या आशेने अंग प्रदर्शन करणाऱ्या so called मराठी अभिनेत्रीची इथे कमी देखील नाही….’. यावर मितालीने म्हटले, ‘संस्कृती आणि काम, कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस् घेता का तुम्ही काकू..? प्लीज घ्या. मला आवडेल जॉइन करायला’. यावर पुन्हा कमेंट करत या नेटीझनने लिहिले, ‘नाही नाही तुमच्या सारख्या लोकांनी असे क्लासेस घेऊन सुद्धा काही विशेष फरक पडणार नाही…’
‘कारण काय आहे कुणी विरोधात बोललं की काका काकू म्हणून संबोधयचे आणि उगीच आपण किती मॉडर्न आहोत असे प्रदर्शन करायचे ..ह्यांच्या पार बुद्धी पलीकडील विषय आहे तो…. beach किंवा स्विमिंग पूल मध्ये साडीचा हट्ट करणार्यांची कीव येते मला खर तर…. तो अट्टाहास मूर्खपणाचा आहे… तू अगदी बिकिनी काय काही न घालता फिरलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही….. फक्त असे फोटो सोशल मीडियावर टाकण्या मागील उद्देश काय असेल हे न समजण्या इतकी सुद्धा जनता अडाणी नाही ना….. आखिर येह पब्लिक हैं ये सब जानती हैं।’ यावर मितालीच्या चाहत्यांनीसुद्धा ट्रोलर्सची शाळा घेतल्याचे दिसत आहे.