Mitali Mayekar : मराठी अभिनेत्रीचे बीचवरील बिकिनी फोटोशूट पाहिले का?


Mitali Mayekar : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि साडी अन अंगभर कपडे असा पेहराव पहिले समोर यायचा. पण अलीकडे काळ वेळ बदलला तसे मराठी चित्रपट श्रुष्टीतील फॅशन ट्रेंडसुद्धा (Fashion Trend) बदलत गेला आहे. अलीकडच्या मराठी अभिनेत्री खूपच बोल्ड अन हटके लूकमध्ये बिनधास्त वावरताना आपण पाहतो. अशा मराठी अभिनेत्रींनकडे पहिले कि हि नक्की मराठीच आह एका असा प्रश्न पडतो. मिताली मायेकर हे अशाच नव्या जनरेशनच्या मराठी अभिनेत्रीचं नाव आहे.

मिताली नेहमी आपले बोल्ड फोटो (Bold Photoshoot) सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनेकदा काहीजण तिला ट्रॉल करतात तर कधी संस्कृतीवरून काहीवाही बोलतात. पण मिताली अशा सर्वांना पुरून उरते अन आपलं बिनधास्त जगणं कायम ठेवत आपल्या रिअल फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहते. सध्या मिताली बाली येथे शूटसाठी गेली आहे. तिने निकताच बाली येथील आपला एक बिकिनी फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केलाय.

मितालीने सनसेटवेळी केलेल्या या बिकिनी फोटोशूटमध्ये आपला हटके अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांची नक्षी असलेल्या बिकिनीत मिताली खूपच सुंदर दिसत आहे. शूटच्या बिझी शेड्युल मधून मितालीने वेळ काढून समुद्रकिनारी भेट देत निसर्गाचा आनंद घेतला आहे.

दरम्यान, कुठं काम मिळत नाही आणि अक्टिंग च्याच नावाने बोंब मग हे असे चाळे करून लोकांचे लक्ष वेधत असते बाकी काही नाही. कलंक आहे मराठी असण्याला हिच्या असं म्हणत एका युजरने ट्रॉल केलंय. तर एकाने तुला स्वातंत्र्य आहे, कोणते कपडे घालायचे आणि कोणते नाही हे तूच ठरव…. बाकीच्यांना काय बोलायचे ते बोलू दे….तू तुझं सुरू ठेव असं म्हणत मितालीला सपोर्ट दिलाय.