मितालीने शेअर केलं बार्बीचं इंडियन एडिशन; सिद्धार्थ म्हणाला, ‘लगीन करायचंय..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावरदेखील भारी चर्चेत आहे. दरम्यान मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ या सिनेमाची चर्चा सुरु असताना मितालीने यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बार्बी’मध्ये विशेष करून गुलाबी रंगाची थीम असते आणि त्यामुळे मितालीने गुलाबी रंगाच्या साड्या नेसून ‘बार्बीचे इंडियन एडिशन’ असा व्हिडीओ बनवला आहे.

मिताली मयेकरने तिचं अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मितालीने गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या शेडमधील तब्बल ६ साड्या विविध स्टाइलमध्ये नेसल्या आहेत. या व्हिडीओसोबत मितालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘जर बार्बी भारतीय असती तर..?’ मितालीने या व्हिडीओला बार्बीचे गाणे जोडले असून संपूर्ण गुलाबी थीममध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडिओतील मितालीच्या मराठमोळ्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खास करून मितालीचा पती म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या इंडियन बार्बीकडे जास्त आकर्षित झाला आहे.

मितालीच्या या खास व्हिडीओवर तिचा नवरा आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अतिशय खास कमेंट केली आहे. त्याने लिहिलं आहे कि, ‘बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं’. त्याची हि क्युट कमेंट पाहून त्यावर मितालीनेसुद्धा लाडात ‘ओके’ असे उत्तर दिले आहे. सिद्धार्थची ही कमेंट अनेकांनी लाईक केली आहे. इतकेच काय तर काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘तुमचे लग्न एकदा झाले ना..? अजून किती वेळा करणार..?’ तर आणखी एकाने म्हटलेय, ‘तुमची बार्बी लईच भारी दिसती ना वं!’ सिद्धार्थशिवाय या व्हिडीओवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.