‘टायगर 3’ सिनेमाला ‘नाळ 2’ टक्कर देणार; बॉलिवूडच्या भाईजानला नागराज मंजुळे भारी पडणार..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची गेले अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हि प्रतीक्षा आता संपणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अगदी दोन दिवस आधी १० नोव्हेंबरला मराठी सिनेविश्वातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘नाळ २’देखील प्रदर्शित होऊ घातला आहे. ज्याची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे हे दोन चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देणार असे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘टायगर ३’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता फक्त प्रदर्शनाची बात पाहिली जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिनाचा जबरदस्त अ‍ॅक्शन लूक पहायला मिळणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मूहूर्तावर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर ही दिवाळी खास करण्यासाठी नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ हा मराठी चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यावेळी नाळ’मध्ये भाव खाऊन गेलेला चैत्या त्याच्या खऱ्या आईला भेटल्याचे आपण पाहू शकणार आहोत. एक अपूर्ण गोष्ट आता पूर्ण होताना दिसणार आहे.

त्यामुले सध्या ‘टायगर ३’ आणि ‘नाळ २’ या दोन्ही चित्रपटांची मनोरंजविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. आतापर्यंत ‘टायगर ३’ची सिरीज आतापर्यंत तुफान गाजली आहे. तर ‘नाळ’चा पहिला भाग तुफान यशस्वी ठरला. यानंतर दोन्ही चित्रपटांच्या पुढील भागांकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे भाईजानचा ‘टायगर ३’ आणि नागराज मंजुळेंचा ‘नाळ २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना कडक टक्कर देणार यात काही वाद नाही. आता पाहायचंय कि या दोन चित्रपटांमध्ये कोण कोणाला वरचढ ठरतंय..?