मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ह्या मराठी मनोरंजन विश्वातील दोन बहिणी आहेत. मृण्मयीसोबत गौतमीने देखील अभिनयातीचा हात आजमावला आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी गौतमीच लग्न झालं. अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत गौतमीचा विवाह झालेला आहे आणि त्यांच्या एका नवीन आयुष्याला सुरुवात देखील झालेली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. परंतु अशा एका फोटोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
मृण्मयीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देशपांडे यांच्या जावयांचाच म्हणजेच तिचा पती स्वप्नील राव आणि गौतमीचा पती स्वानंद तेंडुलकर यांचा फोटो शेअर केला आहे. त्या दोघांच्या साईट फेसचा हा फोटो आहे. त्यात त्यांची हेअर स्टाईल आणि दाढी अगदी सेम आहे. आणि अगदी ते दोघेजण जुळे भाऊ वाटतील असा हा फोटो आहे.
स्वानंद आणि स्वप्निलचा हा फोटो शेअर करून मृण्मयी एक भन्नाट कॅप्शन दिलेले आहे. तिने लिहिले आहे की, “फोटोमधील आठ फरक ओळखा आणि एक हजार रुपये मिळवा” त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा – ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित
या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. आणि त्यांच्यातील फरक सांगत आहेत.अशा प्रकारे एका चाहत्याने हे फरक ओळखले आणि तशी कमेंट केली. त्यावर मृण्मयीने “बेस्ट आता एक हजार रुपये धाकट्या बहिणीकडून घ्या.”असा त्याला रिप्लाय दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट देखील येत आहे.