Mrunmayee Deshpande | महाबळेश्वरच्या शेतात मृण्मयी देशपांडे हिने पिकवली स्ट्रॉबेरीची शेती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल


Mrunmayee Deshpande | अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक मालिका नाटक तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच महाबळेश्वर मध्ये तिचं एक स्वतःचं घर बांधलेले आहे. या घराबद्दलच्या अनेक व्हिडिओची सोशल मीडियावर शेअर करत असते.

मृण्मयीने या तिच्या घराच्या बाजूला एका जागेत भाजी देखील लावली आहेत. त्याचप्रमाणे मृण्मयीने तिच्या शेतात चक्क स्ट्रॉबेरी पिकवली आहे. नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मृण्मयी आणि तिचा नवरा शेतात पिकवलेल्या स्ट्रॉबेरी काढताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांनी त्यांच्या शेतात जी स्ट्रॉबेरी पिकवली आहे ते स्ट्रॉबेरी ते काढत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे इतर शेत देखील दाखवलेले आहे. त्यांच्या शेतात स्वतः भाज्या पिकवल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा सगळ्यांना दिसत आहे.

हेही वाचा – Siddharth Jadhav | सिद्धूची स्टाईलचं न्यारी ! सोशल मीडियावर व्हायरल झाला नवा लूक

या शेतामध्ये मृण्मयीने स्ट्रॉबेरीसोबत दुधी भोपळा, बीन्स काकडी यांसारख्या भाज्या देखील पिकवलेल्या आहेत. कामाच्या व्यापातून वेळ मिळाल्यानंतर मृण्मयी आणि तिचा पती हा महाबळेश्वरला जाऊन त्यांच्या या घरी राहत असतात. आणि त्यांच्या स्वप्नातील हे घर अनुभवत असतात.