I Love You राव..!! मृण्मयी देशपांडेचा नवऱ्यासोबत लिपलॉक; सोशल मीडियावर रोमँटिक फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून तिने आपले स्थान भक्कम केले आहे. छोट्या पडद्यावर ‘अग्निहोत्र’ आणि ‘कुंकू’सारख्या दर्जेदार मालिकांमध्ये ती झळकली होती. दरम्यान ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावसोबत लग्न केले आणि यंदा तिच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने सोशल मीडियावर एक खास रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/C0YKJrHofYt/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय लग्नानंतर घर, संसार आणि आपली अभिनयाची आवड जोपासणारी मृण्मयी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. रविवारी ३ डिसेंबर रोजी तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाच एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘७ वर्षे पूर्ण, आय लव्ह यू राव’.

मृण्मयीने शेअर केलेला हा रोमँटिक लिपलॉकचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचे चाहते आणि मराठी विश्वातील सेलिब्रिटी मंडळींनी या फोटोवर कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, याच वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात तिने दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची भूमिका साकारली होती. शिवाय ‘सुभेदार’ या चित्रपटात तिने केसर हि आव्हानात्मक भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.