हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कलाविश्वात लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी गेल्या वर्षी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. नुकताच त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाला आहे आणि यानिमित्त मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ आवर्जून शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पहायला मिळत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
प्रथमेश आणि मुग्धा यांचा कोकणात विवाह सोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने दोघांची सप्तपदी घेतली. सहजीवनाची सुरुवात करून त्यांना आता १ महिना झाला आहे. या महिन्याभरात त्यांचं नातं आणखीच घट्ट झालं आहे आणि आता हा प्रवास कधीही न थांबण्यासाठी सुरु झाला आहे. यानिमित्त मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओत त्यांच्या लग्नातील अनसीन फोटो, वरमाला विधी, मंगलाष्टक विधी दिसत आहेत. या व्हिडिओसोबत ‘डंकी’ या सिनेमातील ‘ओ माही’ हे गाणं जोडण्यात आलं आहे.
इतकंच नव्हे तर, मुग्धा वैशंपायन- लघाटेने हा व्हिडीओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय, ‘सर्वात शुद्ध व अनंत काळापर्यंत कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला एक महिना पूर्ण झाला आहे. मुंडे, तेरी तो पर्मनंट बुकिंग हो गई!’ मुग्धाच्या या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आणि या व्हिडिओतील प्रथमेश- मुग्धाचे लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.