मुग्धाच्या बहिणीचंही ठरलं..!! दोन्ही बहिणींच्या केळवणाला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाली,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेले छोटे सूर वीर आता मोठे झाले आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे याच कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. आपल्या कर्णमधुर आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या लग्नाची अधिकृत माहिती दिली आहे. यानंतर आता मुग्धाने शेअर केलेल्या एका पोस्टमधून समोर आले आहे कि तिच्या बहिणीचे देखील लग्न ठरले आहे.

मुग्धा आणि प्रथमेश यांचं लग्न ठरलं असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपलं नातं जगासमोर आणलं. सध्या हि जोडी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. दरम्यान मुग्धाच्या सख्ख्या बहिणीचे देखील लग्न ठरले आहे. त्यामुळे मुग्धासोबत तिच्या बहिणीच्या लग्नाची देखील जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान दोन्ही बहिणींच्या केळवणांना सुरुवात झाली आहे. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नाच्या केळवणांना आधीच सुरुवात झाली होती. त्यानंतर आता तिच्या बहिणीच्या केळवणांनासुद्धा सुरुवात झाली आहे.

मुग्धाचे नातेवाईक, मित्रमंडळी दोन्ही बहिणींचे थाटामाटात केळवण करत आहेत. दरम्यान तिने एका केळवणाचा फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. यात मुग्धाची बहिण मृदुलाचे लग्न ठरल्याचे तिने स्पष्ट केले आहे. यात तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फॅमिली फोटो शेअर केला आहे.सोबत लिहिलंय, ‘प्रिय, लाडके, डिअरेस्ट देवानंद काका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊन ३ वर्ष झाली. असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण येत नाही… आज माझं आणि ताईचं केळवण होतं आपल्या खानावला.. तुम्हाला अशक्य मिस केलं…’. या पोस्टमधून मुग्धाबरोबर तिची बहीण मृदुलाही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.