मुग्धा वैशंपायनची लगीनघाई सुरु; ‘ब्राईड- टू- बी’ पार्टीचे फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय ठरलेली गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने आणि याच कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात शिरकाव करणाऱ्या प्रथमेश लघाटेसोबत प्रेमाची कबुली दिली.

यानंतर हे लिटिल चॅम्प्स मोठे झाले असून आता लवकरच लग्न बंधनातसुद्धा अडकणार असल्याचे समोर आले. दिल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. नुतच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचा विविह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. यानंतर आता लवकरच मुग्धा आणि प्रथमेश यांचे लग्न होणार आहे.

‘आमचं ठरलंय’ म्हणत मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यापासून त्यांचं लग्न कधी होणार..? याबाबत विशेष चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोघांच्या केळवणाचे फोटोसुद्धा व्हायरल झाले. नोव्हेंबरमध्ये मुग्धा आणि प्रथमेशने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या या खास सोहळ्याचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. यानंतर आता मुग्धाच्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गायिका मुग्धा वैशंपायनने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या स्टोरीवर या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाआधी मित्र – मैत्रीणींकडून किंवा भावंडांकडून या पार्टीचे आयोजन केले जाते. नुकतीच मुग्धाची ‘ब्राइड टू बी’ पार्टी पार पडली आहे आणि त्यामुळे मुग्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायनचा अलिबागचे प्रसिद्ध जोगळेकर फार्मचे विश्वजीत जोगळेकर यांच्यासोबत विवाह संपन्न झाला. यानंतर आता मुग्धासुद्धा लवकरच लग्न करणार असे बोलले जात आहे.