‘मर्डरवाले कुलकर्णी’ फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; रोमँटिक अंदाजात केली रिंग एक्सचेंज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी कलाविश्वात जणू लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडेच काही प्रसिद्ध कलाकारांचे लग्न पार पडले. तर काहींचे साखरपुडे धुमधडाक्यात संपन्न झाले. शिवाय काहींनी सोशल मीडियावर आपल्या टू बी… चे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. स्वानंदी टिकेकर – आशिष कुलकर्णी, शुभंकर एकबोटे – अमृता बने, मुग्धा वैशंपायन – प्रथमेश लघाटे, पूजा सावंत – सिद्धेश चव्हाण अशा लोकप्रिय एंगेज्ड जोड्यांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे.

मराठी अभिनेत्री सुकन्या काळणचा नुकताच थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिके आणि त्याची पत्नी सुनैना यांचा समावेश आहे. सुकन्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या साखरपुड्यातील काही गोड क्षण पहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये सुकन्याच्या साखरपुडयात बॅकड्रॉपसाठी ‘कन्या हुई रोशन’ हा विशेष हॅशटॅग वापरल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी सुकन्याने लाल रंगाची शिमरी साडी परिधान केली होती. तर रोशनने शेरवानी परिधान केली होती. सुकन्याने गुडघ्यावर बसून रोशनला अंगठी घातली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी.

सुकन्या आणि रोशन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि आता दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहेत, सुकन्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सचिन पिळगांवकरांच्या ‘एकापेक्षा एक’ या रिअ‍ॅलिटी शोमधून ती घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. प्रिया बापट आणि मुक्त बर्वे यांच्या ‘आम्ही दोघी’ चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. सध्या ती ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.