Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर आणि आता टिझर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Naal 2 Teaser

आता ‘नाळ भाग २’मध्ये चैतूला त्याची खरी आई जवळ घेईल का..? इतकी वर्षं झाल्यानंतर त्यांच्यातील दुरावा निवळेल का..? चैतू त्याचा सांभाळ केलेल्या आईकडे परत येईल का..? त्यांच्यातील अबोला संपेल का..? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत. (Naal 2 Teaser) परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना १० नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये चैतू त्याच्या खऱ्या आईबरोबर दिसतोय. पण त्यांच्या नात्याची नाळ जुळली का..? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

Naal 2 Teaser

‘नाळ भाग २’च्या पहिल्या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील पहिले गाणे ‘भिंगोरी’देखील सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. (Naal 2 Teaser) झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. ‘नाळ’ ने प्रेक्षकांशी नाळ जोडली. राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आता ‘नाळ भाग २’ लवकरच पहिल्या भागातील आठवणींचा खजिना मोठा चैतू पुन्हा उलगडणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ही नात्यांची नाळ अधिकच घट्ट होणार आहे.