Nagraj Manjule|दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात.
अशातच एका मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या पुढील प्रोजेक्टची माहिती सांगितली आहे. नागराज मंजुळे यांनी दिलेले माहितीनुसार ते लवकरच मटका किंगवर सिनेमा बनवणार आहे.
मटका किंगवर बनवणार सिनेमा | Nagraj Manjule
नागराज मंजुळे आता त्यांच्या आगामी मटका किंग नावाच्या सट्टेबाजीवरील वेबसिरीज तयार करणार आहेत. यासाठी ते निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत करणार आहेत. 1960 आणि 90 च्या दशकात घडणारी ही गोष्ट ते दोघे वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहे. ही नवी मटका किंग वेबसिरीज ही भारतातील जुगाराचे संस्थापक आणि मटका किंग ओळखले जाणारे रतन खत्री यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.
हेही वाचा – सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल बंद झालं का..? अभिनेत्रीने Video शेअर करत दूर केली खवय्यांची शंका
कोण आहेत रतन खत्री
रतन खत्री यांची ओळख मटका किंग अशी आहे. त्यांनी मटका खेळण्यांमध्ये अनेक नवनवीन पद्धतींचा शोध लावला. त्यांनी मटक्यातून स्लिप काढण्याची पद्धत संपवली आणि पत्ते खेळून सुट्टी पाहिजे आकडे काढायला सुरुवात केली.
रतन खत्री हे एक सिंधी होते जे फाळणीनंतर सिंध पाकिस्तानमधून मुंबईत आले होते. ज्यावेळी ते मुंबईत आली त्यावेळी त्यांचे वय वर्ष अवघे पंधरा वर्षे इतके होते. त्यानंतर ते कल्याण भगत यांच्या संपर्कात आले. त्यांनी 1962 मध्ये वरळीत पहिला मटका सुरू केला. आणि त्यानंतर ते रतन खत्री याचे व्यवस्थापक बनले. यानंतर दोन मे 1964 साली रतन खत्री यांनी स्वतःचा मुटका व्यवसाय सुरू केला.
प्रेक्षक नाळ 2 च्या प्रतीक्षेत
झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांच्या नाळ 2 दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटांमध्ये श्रीनिवास पोकळे नागराज मंजुळे, देवीका दप्तरकर, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.