Nagraj Manjule| नागराज मंजुळे यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘आंबेडकर माझे वडील तर शिवाजी महाराज…’


Nagraj Manjule |दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात.

नुकतेच नागराज मंजुळे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात अनुराग कश्यप, विशाल भारद्वाजपासून केके मेनन, पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील अनुभव तसेच त्यांच्या खासगी आयुष्य बद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या.

काय म्हणाले नागराज मंजुळे | Nagraj Manjule

या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “,छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजारापेक्षा प्रेम हे वरचढ असतं असं मी मानतो. आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रात एकही असा व्यक्ती सापडणार नाही. जिच्या मनात शिवाजी महाराजांविषयी प्रेम आपुलकी जिव्हाळा नाही. शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व आहे. ज्यांच्यावर प्रत्येक जाती धर्माचे लोक प्रेम करतात. अर्थात काही लोक मुद्दाम त्यांची शिवभक्त दाखवण्यासाठी असले प्रकार करतात. जे मला फार वाईट वाटतात. महाराज हे प्रत्येकासाठी त्यांच्या वडिलांप्रमाणे आहेत. आम्ही त्यांना शिवबा हाक मारतो. जसं ज्योतिबा असे महापुरुष एखाद्या जातीपुरत्याच मर्यादित नसतात ते सगळ्यांचा विचार करतात.”

हेही वाचा- अखेर सत्य उघड होणार!! प्रिया- अस्मिताचा खोटेपणा अर्जुनसमोर येणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

त्यामुळे नागराज मंजुळे म्हणाले की, ,”माझ्या मनात शिवाजी महाराजांपती प्रचंड प्रेम आणि आदर आहे. आणि माझ्या मनात ही गोष्ट कोणीही शिकवण्याची गरज नाही. त् माझं त्यांच्याशी थेट नातं आहे. मी सदैव ही गोष्ट सांगत आहे की, जर बाबासाहेब आंबेडकर हे माझे वडील आहेत तर शिवाजी महाराज हे माझे आजोबा आहेत. याबरोबरच आंबेडकरवादी आणि जातीमुळे आपल्या झालेल्या अपमानाबद्दलही नागराज मंजुळे यांनी मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने भाष्य केले.

त्यांचा हा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड वायरल होत आहे. आणि त्यांच्या चाहतांच्या मनात त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि आदरा आणखीनच वाढलेला आहे.