‘सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा…’; नवऱ्याच्या वाढदिवशी नम्रता संभेरावची खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. भन्नाट कॉमेडी स्किटचे प्रोमो, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती यासह ती अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी याच माध्यमातून चाहत्यांसह शेअर करते. आज नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताचा पती योगेशचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त तिने हि खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश!! मग कुठूनसा येईल राजकुमार… सफेद घोड्यावर होऊन स्वार… ”ती फुलराणी” मधलं हे स्वगत अनेकदा अनेक जणींनी सादर केलंय. मी ही केलं आणि खरोखरीच माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला. माझ्या सुखात तो त्याचं सुख पाहणारा… सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा… त्याने मला दिलेलं प्रोत्साहन, कौतुक, प्रेम, आधार, मला कायम ताज तवानं ठेवतं आय लव्ह यू योगेश… कायम हसत राहा आनंदी राहा. तुझ्या सगळ्या इच्छा स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!’

अभिनेत्री नम्रता २०१३ साली योगेश संभेरावसोबत लग्न केलं. नम्रताचे पती योगेश अभिनयसृष्टीत कार्यरत नसून या दोघांचा प्रेमविवाह झालेला आहे. कॉलेजमध्ये असताना नम्रता आणि योगेश यांची सोशल मीडियामुळे मैत्री झाली आणि हि मैत्री पुढे जाऊन प्रेमात रूपांतरित झाली. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर ६ वर्षांनी नम्रताने रुद्राजला जन्म दिला. अशातच आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने जुन्या आठवणींना उजाळा देत ही खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.