हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनात वसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. हे नारकर जोडपं वयाची पन्नाशी ओलांडूनही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. नुसते कार्यरत नाहीत तर अपडेट सुद्धा आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आजकाल या जोडप्याच्या डान्स रिल्स तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या या टप्प्यावरही ते ज्या पद्धतीने सादरीकरण करतात ते पाहून कुणीही थक्क होईल.
अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची गोष्टच वेगळी आहे. आजकाल कुणीही कशाही साठी चर्चेत येताना दिसतात. पण हे जोडपं काही वेगळंच आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे हे जोडपे त्यांच्या फिटनेससाठी आणि उत्साहासाठी कायम चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांचे डान्स रिल्स व्हजायराल होत आहेत. आताही त्यांचा एक डान्स रील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांची एनर्जी आणि उत्साह पाहून पुन्हा एकदा नेटकरी अचंबित झाले आहेत.
दोघांनीही पारंपरिक वेशभूषेतील एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते साऊथ सॉन्गवर थिरकताना दिसत आहेत. अत्यंत कमी स्टेप्समध्ये ते जी काही धमाल करत आहेत ते पाहून अनेक नेटकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे कि, ‘इतकी एनर्जी हे आणतात कुठून..?’ तर काहींनी असेही म्हटले आहे कि, ‘बास्स्स… असं जगता आलं पाहिजे’. एकाने असेही म्हटले आहे की, ‘कसले भारी आहेत हे.. एकच नंबर’. बाकी हार्ट ईमोजी, फायर ईमोजी आहेतच. या जोडप्याचा हा उत्साह पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.