हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत उत्साही आणि आग्रही अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून कला विश्वात कार्यरत आहेत. त्यांची जोडी हि मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता तुफान असून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचं वय वाढत असलं तरी एनर्जी मात्र तरुणांना लाज आणेल अशी आहे. दोघांच्या फिटनेसबद्दलही तसंच काहीस आहे. आजही दोघे मालिका विश्वात कार्यरत आहेत आणि त्याचसोबत ते सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट रिल्स बनवताना दिसतात. आताही त्यांनी असाच एक रील शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ गाण्याचं तुफान क्रेझ आहे. या गाण्यात अभिनेत्रीने असा काही नृत्याविष्कार दाखवला आहे कि भल्याभल्यांचे डोळे विस्फारले आहेत. याच गाण्यावर अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी भन्नाट डान्स केला आहे. मध्यंतरी अविनाश नारकर यांनी अभिनेत्री अश्विनी कासारसोबत काही डान्सचे रील व्हिडीओ बनवले होते आणि त्यानंतर अनेकांनी ऐश्वर्या यांच्यासोबत रील बनवा असे म्हटले होते. तर आता या चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अविनाश आणि ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ प्रचंड एनर्जेटिक आहे. दोघांनीही ‘कावाला’ या गाण्याची हूक स्टेप या व्हिडीओत केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ऐश्वर्या नारकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मी अविनाश यांच्या एनर्जीला मॅच करण्याचा प्रयत्न करतेय..’. नारकर जोडप्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यातील एका युजरने म्हटले आहे कि, ‘खूप दिवसांपासूनची अपेक्षा होती. आज पूर्ण केली, दोघांनी एकत्र येऊन डान्स केलात…लई भारी वाटलं’. तर आणखी एकाने म्हटले, ‘आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही लाजवाल…काय एनर्जी आहे!’