बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीने लिहिले होते ‘सीता रामम्’ सिनेमाचे हिंदी संवाद; म्हणाली, ‘अत्यंत काव्यात्मक..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या हिंदी डबने देखील प्रेक्षकांची मन जिंकली होती. हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. हनु राघवपुडी दिग्दर्शत ‘सिता रामम्’ या चित्रपटाचे हिंदी संवाद एका मराठी अभिनेत्रीने लिहिले आहेत. याबाबत तिने स्वतःच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

‘सीता रामम’ या सिनेमाची कथा भारतीय सैन्यातील एका जवानाची प्रेमकथा आहे. जी रसिक प्रेक्षकांना प्रचंड भावली. हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आणखीच लोकप्रिय ठरला. अशा या गाजलेल्या ‘सिता रामम्’ चित्रपटाचे हिंदी संवाद बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळेने लिहिले आहेत. अवघ्या ५ दिवसांत तिने हे काम पूर्ण केलं होतं आणि याबाबत तिने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला. एका नामवंत एंटरटेनमेंट पॉडकास्टसोबत गप्पा मारताना नेहाने सांगितले कि. ‘मधल्या काळात मी खूप लिखाणाचं काम केलं. पण सगळ्यांनाच माहितेय ते काम असं नाही. म्हणजे ‘सीता रामम्’ नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघं जण त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. तर त्या चित्रपटाचे संपूर्ण हिंदी संवाद मी लिहिलेत’.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

पुढे म्हणाली, ‘कारण हा अत्यंत लिरिकल चित्रपट आहे. अत्यंत रोमँटिक, काव्यात्मक असा चित्रपट आहे आणि त्याच्यातले संवादही तसेच असले पाहिजेत. ते असे रोखठोक नुसतं तेलुगू टू हिंदी ट्रान्सलेशन केल्यासारखे संवाद होत होते. हिंदी भाषेची गंमत त्याच्यात येत नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, ”कधीपासून काम सुरू करुयात”. तो म्हणाला, ”आता”. पुढच्या ५ दिवसांत आम्ही खरंच दिवसरात्र त्या स्टुडिओमध्ये राहिलो, काम केलं. ५ दिवसांत आम्ही तो चित्रपट लिहून पूर्ण केला होता’. नेहा शितोळे हि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती होती. शिवाय तिने अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम केले आहे. फक्त मराठीच नव्हे तर हिंदीतही तिने दमदार काम केले आहे