हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून गाणे सोशल मीडियावर व्हायला होत आहे.
हे गाणे पूर्णपणे मराठी मुलींच्या स्वभावाचे वर्णन करते. अत्यंत उत्तमरित्या या गाण्याचे बोल आणि संगीत एकमेकांमध्ये विणले आहे. या गाण्याला आतापर्यंत १४ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देताना गाण्याचे कौतुक केले आहे. एकाने म्हटले कि, ‘अप्रतिम गाणे. मी या चित्रपटासाठी उत्सुक आहे. हा मराठी चित्रपट खरंच पाहण्यासारखा आहे’. तर आणखी एकाने म्हटले, ‘मेहनत आणि गायकांच्या आवाजाने निःशब्द झालो.. मन फुलवणारे संगीत’. तर आणखी एकाने म्हटले, ‘गाणे खूप दर्जेदार आहे… आता प्रतीक्षा आहे ती रिलीजची’.
गाण्याबद्दल बोलताना गायक आदर्श शिंदे म्हणाला, ‘आमचे पायही हे गाणे गाताना आपसूक थिरकत होते. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे, उत्साह आणि आनंदाने भरलेले आहे. या गाण्याचे चित्रीकरणही कमाल झाले आहे’. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.