सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकण्याची सज्ज आहे. त्यांचा नवा चित्रपट ‘डेटभेट’ या जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच यांच्या भूमिकेचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहेत.

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत या चित्रपटाचे नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये संतोष जुवेकर आणि सोनाली कुलकर्णी दोघे दिसत असले तरीही या चित्रपटात आणखी एक अभिनेता मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. तो म्हणजे अभिनेता आणि प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत ढोमे. या चित्रपटातून सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे असे हे तिन्ही कमालीचे कलाकार एकत्र दिसणार आहेत. हे त्रिकुट एक वेगळीच एनर्जी घेऊन थिएटरमध्ये धमाल करण्यास सज्ज झाले आहे.

https://www.instagram.com/p/CnBndtxtLKQ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

‘डेटभेट’ या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा लोकेश विजय गुप्ते यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे यांचे आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. ‘डेट भेट’ या चित्रपटाची सह निर्मिती निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेझ पटेल, प्रशांत जम्मूवाला, हनी शर्मा यांनी केली आहे. तर असोसिएट निर्माते अजय सोनी आणि प्रशांत शेळके आहेत. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर प्रदीप खानविलकर आणि चित्रपटाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट येत्या १४ जुलै २०२३ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.