नशिबाचा खेळ!! लालबागचं हनुमान थिएटर गाजवणाऱ्या लावणी साम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ

Shantabai Kopargaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेला ‘लावणी’ हा लोककलेचा एक प्रकार आहे. आजतागायत अनेक लावणी कलावंत होऊन गेले. प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख, एक वेगळी अदा आजही बघणाऱ्याच्या काळजात घर करून बसली आहे. मुंबईतील लालबाग परिसरात असणाऱ्या हनुमान थिएटरमध्ये तर लावणीचे फड गाजायचे. असाच एक फड गाजवणारा काळ लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचा होता. … Read more

चिन्मय उद्गीरकरच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘नो मेकअप लूक’

Dil Malangi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपली भूमिका उत्तमरित्या वठवणे किती महत्वाचे असते काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे भूमिकेसाठी हि कलाकार मंडळी काहीही करायची तयारी दाखवतात. ‘दिल मलंगी’ या आगामी सिनेमाच्या नायिकेने देखील आपल्या भूमिकेसाठी ‘नो मेकअप लूक’ साकारला आहे. हि अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेढेकर. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत … Read more

‘तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा..’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टवरील कॅप्शन चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्विनीच्या या भूमिकेवर प्रेक्षक नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. शिवाय अश्विनी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशी देखील लोकांना प्रिय आहे. ती केवळ एक अभिनेत्री नव्हे तर सामाजिक कार्यात नेहमीच … Read more

गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’

Raavrambha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; कधी व कुठे होणार सन्मान..? जाणून घ्या

Asha Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत चार दशकांहून अधिक काळ काम करत प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आशा काळे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे आणि म्हणूनच त्यांना यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनादिवशी … Read more

दुःखद!! दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन; पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Pravin Karale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये मनोरंजन सृष्टीने अनेक दिग्गज कलाकार मंडळींना गमावले आहे. अलीकडेच सुलोचना दीदी यांचेही निधन झाले आणि संपूर्ण सिने विश्व शोक सागरात बुडाले होते. अशातच आता पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वातील आणखी तारा निखळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाल्याचे हे वृत्त आहे. त्यांच्या निधनाची … Read more

यांना देव कसं म्हणायचं..?; कोकण हार्टेड गर्लने उघड केला KEM हॉस्पिटल यंत्रणेचा हलगर्जीपणा

Ankita Walwalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकरने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुंबई, परळमधील नामवंत सरकारी हॉस्पिटल केईम मधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे याबाबत चर्चा होऊ लागली आहे. अंकिताचा मित्र किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग … Read more

टन टन वाजलं… मटान शिजलं!! संतोष जुवेकरने चुलीवर शिजवलं वशाट; व्हिडीओ झाला व्हायरल

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आयुष्यातील लहान मोठे प्रसंग, किस्से, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी तो सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. अतिशय दिलखुलास आणि तगडा अभिनेता म्हणून संतोषची ख्याती आहे. त्याचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. नुकताच सोशल मिडीयावर एक मस्त … Read more

अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज

Ajinkya Raut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक … Read more

‘निळू फुल्याच्या नादाला लागू नगं.. लै बेकार हाय त्यो’; मराठी अभिनेत्याची आज्जी असं का म्हणाली..?

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात किरण माने हे नाव चांगलं ओळखीचं झालं आहे. वजनदार शब्दांवरील पकड आणि भावनांचा मेळ घालण्यात किरण मानेंचा जणू हातखंडाच आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे किरण माने अनेकदा विविध किस्से, अनुभव शेअर करत असतात. आजही त्यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे. पण हा किस्सा जरा भावनिक अन काळजाला हात … Read more

‘निंदकाचे घर असावे शेजारी..’; भाऊ कदमच्या कोकणातील घराच्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष

Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो आहे. यामधून निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, अंकुर वाढवे, सागर कारंडे आणि अविभाज्य भाग असलेला भालचंद्र कदम अर्थात भाऊ गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. हे सर्व कलाकार प्रेक्षकांचे अतिशय लाडके आहेत. त्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more

मन झुलतया गात गानी.. ‘कुन्या राजाची गं तू रानी’; नव्या मालिकेतून ‘गुंजा’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील अतिशय गोड चेहरा, सुंदर हास्य आणि मधुर आवाज असलेली अभिनेत्री शर्वरी जोगने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आतापर्यंत ‘जीव झाला येडापीसा’, ‘जाऊ नको दूर बाबा’ अशा मालिकांमधून ती अत्यंत लक्षवेधी आणि महत्वाच्या भूमिका साकारून प्रकाश झोतात आली आहे. एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून तिने अनेक विविध … Read more

सालाबादप्रमाणे यंदाही…!! जागतिक योग दिनी प्राजक्ता माळीने घातले 108 सूर्यनमस्कार; व्हिडीओ व्हायरल

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामूळे आणि अप्रतिम हास्यामुळे नेहमीच सर्वांचे मन जिंकून घेते. शिवाय ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ताच्या सुंदर दिसण्यामागे योगा हे एक महत्वाचे कारण आहे. प्राजक्ता नियमितपणे योगाभ्यास करते आणि आज तर जागतिक योग दिन असल्यामुळे तिने सालाबादप्रमाणे … Read more

‘आमच्या रावणाला VFX’ची गरज नाही’; बालकलाकारासोबत तुलना करत अभिनेत्रीने उडवली सैफची खिल्ली

Radhika Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. रिलीजपासून या सिनेमावर सुरु झालेलं ट्रोलिंग काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. हा सिनेमा चांगला हिट होईल अशी आशा होती पण सिनेमावर नुसता टीकांचा वर्षाव होतोय. या सिनेमात प्रभास, क्रिती, सैफ अली खान यांसारखे बडे कलाकार असूनही सिनेमावर टीका होतेय हे … Read more