सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय स्पेन व्हॅकेशन..?; फोटोंमुळे चर्चांना उधाण

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सईची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील तिची जागा निर्माण केली आहे. यामुळे सईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ सिनेमा, शो … Read more

आमचा हास्य जत्रेचा ‘कातील मोरे’..; कोकणच्या पारसमणीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Prabhakar More_Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ … Read more

‘निर्लज्ज माणसा.. हिंदूंचा घात केला’; ‘आदिपुरुष’मध्ये हनुमान साकारणाऱ्या देवदत्तवर प्रेक्षक भडकले

Devdatta Nage

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या धगधगता विषय झाला आहे. रिलीजपासून या सिनेमावर टीकांचा मारा होत आहे. सिनेमातील पात्रांचे कपडे, देखावे, VFX, संवाद सगळं काही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असे तोडीचे कलाकार असूनही सिनेमा टीकांचा … Read more

‘हे शोभतंय..? रामायण आहे कि..’; ‘आदिपुरुष’मध्ये विभीषणाची पत्नी साकारणारी मराठी अभिनेत्री ट्रोल

Trupti Todarmal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पोस्टर, टीझर रिलीज झाल्यापासूनचं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. मात्र तरीही VFX मूळे काही ना काही चांगलं पहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर जो भ्रमनिरास झालाय त्यावरून सिनेमाचं सुरु झालेलं ट्रोलिंग थांबेल असं वाटत नाही. आधी लूक, मग डायलॉग आणि आता एका सीनमुळे हा … Read more

रितेश देशमुखमुळे पूर्ण झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; काय आणि कसं..? ते जाणून घ्या

Riteish Deshmukh_ Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्यरत आहे. त्याचं फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे. रितेश केवळ अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या संस्कारांमुळेदेखील ओळखला जातो. नुकतीच मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रितेश देशमुखचे आभार मानले आहेत. या … Read more

‘ज्ञानेश्वर माऊली’मधील पांडुरंग साकारतोय आता ‘बानूचा मल्हारी’; नव्या गाण्याचे पोस्टर व्हायरल

Banucha Malhari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार दररोज नवनवीन कलाकृती सादर करत असतात. या कलाकृतींमधून ते विविध प्रकारचे जॉनर प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतात. यामध्ये नाटक, चित्रपट आणि गाण्यांचा समावेश आहे. असच एक नादखुळा प्रेमाची गोष्ट सांगणार अतिशय गोड गाणं घेऊन आर जे फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘बानूचा मल्हारी’ असे या गाण्याचे शीर्षक … Read more

‘आदिपुरुष’मध्ये सोनाली खरेने साकारली कैकेयीची भूमिका; चाहते म्हणाले, ‘.. फार वाईट वाटलं’

Sonali Khare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित सिनेमा ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासून नुसता ट्रोल होतोय. पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार, हनुमानाचे संवाद आणि सपशेल गंडलेले VFX या ट्रोलिंगचे मुख्य कारण आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले असून या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांचादेखील समावेश आहे. सिनेमात प्रभासने प्रभू श्रीराम, क्रितीने माता सीता, सैफ अली खानने रावण … Read more

माझ्या हातचा चहा.. कधी येताय प्यायला? अरुंधतीच्या लेकाने सुरु केला स्वतःचा कॅफे; Video व्हायरल

Niranjan Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या मोठ्या मुलाची अर्थात अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात एखादा बिजनेस अर्थात व्यवसाय सुरु करताना दिसत आहेत. जसे कि, प्राजक्ता माळीने ‘प्राजक्तराज’ हा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. तर … Read more

‘बटरफ्लाय’ने करून दाखवलं; मराठी सिनेमाला तिसऱ्या आठवड्यातही मिळतोय उदंड प्रतिसाद

Butterfly

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या ‘बटरफ्लाय’ … Read more