एकोप्याची दिवाळी! MHJ फेम अभिनेत्याने शेअर केली राहत्या चाळीतील दिवाळीची खास झलक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीचे चार दिवस सर्वत्र नुसता आनंदी आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण असतं. कंदील, दिवे, रांगोळ्यांनी दिवाळीचे रूप आणखीच खुलते. जो तो सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून आपण दिवाळी कशी साजरी करतो हे दाखवत असतो. सध्या हाच उत्साह सेलिब्रिटी मंडळींमद्ये देखीक पहायला मिळतोय. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते साजरी करत असलेल्या दिवाळीची झलक शेअर करत आहेत. यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम एका अभिनेत्याच्या तो राहत असलेल्या चाळीतील दिवाळीची झलक शेअर केली आहे.

सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाश झोतात आलेला अभिनेता निखिल बने अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. निखिल आजही त्याच्या आई वडिलांसोबत भांडुपला एका चाळीत राहतो. जशी बांगला आणि फ्लॅटमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रत्येकाचा आनंद असतो. तसा चाळीत दिवाळी साजरा करण्याचा एक वेगळाच आनंद असतो ज्याचा निखिल आजही उपभोग घेत आहे. सुरुवातीला दिसणाऱ्या चाळी आज टॉवरमध्ये परिवर्तित झाल्या. पण उरलेल्या चाळींमध्ये आजही दिवाळी साजरी करण्याची परंपरा होती तशीच आहे.

अभिनेता निखिल बनेने तो राहत असलेल्या चाळीतील दिवाळीची एक खास झलक त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. निखिलने शेअर केलेल्या व्हिडिओत प्रत्येकाच्या घरासमोर सारखेच आकाश कंदील लावलेले दिसत आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घरातील स्त्री दरवाज्यात बसून सुंदर रांगोळी काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना निखिलने ‘एकोप्याची दिवाळी…’ असे कॅप्शन दिले आहे. निखिलने शेअर केलेली व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना पूर्वीच्या चाळींची आठवण झाली आहे.