MHJ फेम शिवाली आणि निमिषचं अफेअर आहे..? अभिनेता म्हणाला, ‘आम्हाला एकत्र खूप…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. त्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता निमिष कुलकर्णी. मध्यंतरी शिवाली आणि निमिष यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर अखेर आता अभिनेता निमिष कुलकर्णीने मौन सोडलं आहे.

त्याच झालं असं कि, ‘शिवालीने काही महिन्यांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने शेअर केलेल्या फोटोत निमिषचा हात हातात पकडला होता. तर निमिष गोड हसताना दिसत होता. या फोटोसोबत तिने लिहिलं होतं की, ‘माझ्या निब्बाबरोबर डेट’. यासह तिने क्युट बेबी असं हॅशटॅगसुद्धा दिलं होतं. इतकाच काय तर त्यांचा रोमँटिक अंदाजात ‘गेरूआ’ गाण्यावरील व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामुळे नेटकऱ्यांनी थेट जोडी लावत शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले. हळूहळू हि अफवा वाऱ्यासारखी पसरत गेली आणि नंतर माध्यमांमध्येदेखील त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली.

निमिषने एका नामवंत एंटरटेन्मेंट यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना म्हटले कि, ‘जेव्हा शिवालीबरोबरच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा या सेटवरच्या १५ जणांनी तरी त्या मला पाठवल्या होत्या. त्या पण वेगवेगळ्या वृत्तसंस्थेच्या बातम्या पाठवल्या. हे काय आहे? निमिष हे खरं आहे का?, असं प्रत्येकांनी त्या बातम्यांच्या खाली हे एक वाक्य लिहिलं होतं. पण, ही अफवा आहे. अजिबात असं काही नाहीये. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत’.

‘उद्या साक्षीने जरी माझ्याबरोबर स्टोरी टाकली, तरी तुम्ही असं काही समजू नका. आम्हाला एकत्र खूप चांगलं काम करायचं आहे, पण ती अफवा मी खूप एन्जॉय केली होती’. दरम्यान, निमिष ‘स्टार प्रवाह’च्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत दिसत होता. आता मालिका बंद झाल्यानंतर तो पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये दिसणार आहे.