नवराई माझी लाडाची गं!! परदेशात मराठमोळ्या गाण्यावर थिरकल्या निवेदिता सराफ; व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कारण या जोडीने कला क्षेत्राला दिलेलं योगदान फार मोठं आहे. अशोक मामांइतक्याच निवेदिता सराफ देखील कला विश्वाला समर्पित आहेत. आजही त्या विविध मालिका, चित्रपट, नाटक, ब्लॉग अशा माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. सोशल मीडियावर निवेदिता सराफ प्रचंड सक्रिय आहेत आणि त्यामुळे चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी त्या विविध पोस्ट शेअर करत असतात. आताही त्यांचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

माहितीनुसार, अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सऱाफ हे त्यांचे नाटक ‘व्यॅक्यूम क्लिनर’च्या परदेश दौऱ्यावर आहेत. यामुळे नाटकाची संपूर्ण टीम परदेशात गेली आहे. ‘व्यॅक्यूम क्लिनर’ या नाटकात अशोक सराफ मुख्य भूमिकेत असून निर्मिती निवेदिता सराफ यांनी केली आहे. दरम्यान नाटकाचा हा परदेश दौरा नाटकाच्या टीमसोबत निवेदिता फुल्ल एन्जॉय करताना दिसत आहेत. निवेशीत यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओत त्या नाटकाच्या टीमबरोबर परदेशात मराठी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

निवेदिता यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्या ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहते या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना निवेदिता यांच्या डान्सचे कौतुक केले आहे. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहेत. याआधीदेखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.