गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या टुरिंग टॉकीजमध्ये ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज शुक्रवार २३ जून २०२३ पासून टुरिंग टॉकीज मध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टुरिंग टॉकीज पुन्हा एकदा आकर्षण ठरणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

A post shared by Anup Jagdale (@anupjagdale_official)

टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मोठमोठ्या शहरांमध्ये रिलीज झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे सिनेमा जातो आणि मग त्या त्या ठिकाणचे प्रेक्षक मोठ्या कुतूहलाने तो सिनेमा पाहतात. काळाच्या ओघात हा व्यवसाय मागे पडला असला तरी दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी टुरिंग टॉकिजच्या माध्यमातून ‘रावरंभा’ गावागावांत पोहचवण्याचे ठरवले आहे. याबाबत बोलताना अनुप जगदाळे म्हणाले कि, ‘टुरिंग टॉकीज केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते ती एक संस्कृती होती. पण अगदी जत्रा- यात्रांतही आकर्षण असणारे तंबू कालपरत्वे दुरापास्त होऊ लागले. अशा टुरिंग टॉकीजने ग्रामीण भागातल्या रसिकांचे रसिकत्व जपले. वाढविले’.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Raavrambha – रावरंभा (@raavrambhafilm)

पुढे म्हणाले, ‘आजच्या बदलत्या मनोरंजन साधनांमुळे टुरिंग टॉकीज हे काहीसं मागे पडलं असलं तरी चित्रसृष्टी बहरण्यासाठी तसेच आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी या माध्यमातून ही प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठीच ‘रावरंभा’ चित्रपट टुरिंग टॉकीजच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. चित्रपटगृहात रसिकांनी ‘रावरंभा’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. टुरिंग टॉकीजमध्ये ही हाच प्रतिसाद नक्की मिळेल असा मला विश्वास आहे’. शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा या चित्रपटात ओम भूतकर, मोनालिसा बागल, शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, मयुरेश पेम, शशिकांत पवार आदि कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आणि डॉ. अजित भोसले, संजय जगदाळे सहनिर्माते आहेत.